अनोख्या पद्धतीने "फ्रेंडशिप-डे" साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

राहुरी (नगर): शहरातील विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या 1988 बॅच च्या  दहावीच्या वर्गमित्रांनी रविवारी मृत मित्राच्या, कुटुंबाला 51 हजार रुपयांची मदत करून अनोख्या पद्धतीने "फ्रेंडशिप-डे' साजरा केला. 

वर्गमित्र अशोक गडगुळे (रा. राहुरी) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची 20 वर्षांची मुलगीही दीर्घ आजाराने पीडित आहे. घरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. याबाबत माहिती मिळताच 1988च्या वर्गमित्रांनी एकत्र येत मित्राच्या मुलीच्या उपचारासाठी मदतनिधी गोळा केला.

प्रदीप भट्टड, बाळासाहेब गिरमे, डॉ. प्रवीण क्षीरसागर, पवन सोनग्रा, शैलेंद्र बांगर, सुनील मुळे, सुनील नेवासकर, अजय बोगावत, किशोर झिने, भाऊसाहेब बेल्हेकर, जितू जैन यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश गडगुळे यांच्या पत्नीच्या स्वाधीन केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News