मी गूगल कस्टमर केअरमधून बोलतोय! आणि 70 हजार गेले...

परशुराम कोकणे
Sunday, 4 August 2019

सोलापूर : मी गूगल कस्टमर केअर सेंब्र येथून बोलतोय, असे सांगून सोलापुरातील तरुणाची 70 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

सोलापूर : मी गूगल कस्टमर केअर सेंब्र येथून बोलतोय, असे सांगून सोलापुरातील तरुणाची 70 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

रवी कल्याणराव कोगनुरे (वय 28, रा. बनशंकरीनगर, दहिटणे रोड, शेळगी, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. 31 जुलैला रवी कोगनुरे याच्या मोबाईलवर फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी गूगल कस्टमर केअर सेंब्र येथून बोलतोय असे सांगून माहिती घेतली. त्यानंतर रवीच्या गूगल पे अकाउंटमधून 70 हजार रुपये ट्रान्सफर घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण दाईंडगडे तपास करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News