उंची 2 फुट मात्र दहावीच्या निकालात गरुढझेप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • दहावीत मिळविले 76 टक्के गुण 

नागपूर : दहावी परीक्षेमध्ये शहरातील एका विशेष विद्यार्थिनीने परीक्षा दिली होती. शहरातील रूक्‍मिनी नगर येथील रहिवासी आंचल संजय निंबार्ते ही उंचीने केवळ 2 फुट असली तरी निकालात 76.20 टक्के गुणासह तीने स्वत:ची उंची वाढवून घेत स्वत: चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घातली आहे. आंचलने इयत्ता दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत अनेकांना प्रेरणा देणाचे काम केले आहे. 

आंचलला तिच्या घराच्या जवळील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. आंचलचे वडील संजय निंबार्ते खाजगी काम करतात तर आई मनिषा निंबार्ते गृहिणी आहेत. आंचलने या यशाबद्दल सांगितले की, तिला गणित विषयात विशेष आवड आहे. मात्र, इतिहास आणि विज्ञान विषयापासून भिती वाटत होती. नियमित अभ्यासाने तेही सोपे केले. बोर्डाच्या परीक्षेसाठी आंचलने सुरुवातीपासूनच तयारी सुरू केली होती. त्यासाठी पुस्तक आणि स्वत:च्या नोट्‌सच्या माध्यमातून ती अभ्यास करत होती.

अनेकदा पहाटे चार वाजता उठूनही अभ्यास करत होती. अधिक वेळ बसून अभ्यास करणे तिला कठीण होत होते. त्यामुळे चार तास अभ्यास आणि थोडी विश्रांती अशा प्रकारे आंचल अभ्यास करत असे. पुढे आंचलला विज्ञान शाखेत प्रवेश घेवून इंजिनिअर बनायचे आहे. त्यासाठी ती विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे. अभ्यासासह आंचलला पेटींग आणि संगीतामध्येही आवड आहे. आई- वडील आणि शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे यश गाठता आल्याचे आंचल सांगते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News