'हिना' चित्रपटामधून पुन्हा रंगभूमीवर

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Monday, 1 April 2019

छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री हिना खान. ‘ये रिश्‍ता क्‍या केहलता है’ या मालिकेनंतर हिनाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री हिना खान. ‘ये रिश्‍ता क्‍या केहलता है’ या मालिकेनंतर हिनाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

 त्यानंतर तिने अनेक मालिका आणि रिॲलिटी शोज करत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. हिना आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

कारगील युद्धानंतर काश्‍मीरमध्ये राहणाऱ्या लोकांवर काय परिणाम झाला? कारगील युद्धानंतरची नेमकी परिस्थिती काय होती? हे या चित्रपटात दाखवलं आहे.

हिना सांगते, ‘काश्‍मीरमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव काही निराळाच आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असणार याचीच उत्सुकता आहे.

’ राहत काझमी निर्मित याच्या दिग्दर्शनाची धुरा हुसैन खान यांच्या हाती आहे. हिना तिच्या या पहिल्या चित्रपटामधून प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहायचंय.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News