नवी मुंबईला पावसाने झोडपले; खारघरमध्ये पाणीच पाणी

हर्षल भदाणे पाटील
Monday, 8 July 2019

पांडवकडा धबधब्याचा पाणी वाहून नेणारा नाला फुटल्याने सायन-पनवेल महामार्गावर पाणी, मोठ्या संख्येने गाड्या पाण्यात अडकल्या, पनवेल ,पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प.

खारघर: मुंबईसह नवी मुंबईमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून, सायन पनवेल महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. नवी मुंबईमध्ये 9 ठिकाणी पाणी साचले असुन दोन वृक्ष कोसळले . सकाळी साडेआठ वाजल्यापासून 1.30 पर्यंत 81 मिमी. पावसाची नोंद करण्याली आली आहे. 

 खारघरमध्ये पाणीच पाणी

खारघर परिसरातही पावसाने सकाळपासून धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले असून जागोजागी खड्डेही पडले आहेत. आणि याचा वाहतूकीवरही परिणाम होत आहे. पांडवकडा धबधब्याचा पाणी वाहून नेणारा नाला फुटल्याने सायन-पनवेल महामार्गावर पाणी झाले आहे. मोठ्या संख्येने गाड्या पाण्यात अडकल्या होत्या. यामुळे पनवेल ,पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याचा कोपरा गावातील ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागतोय. नाल्याचे पाणी थेट गावाच्या प्रवेश द्वाराजवळ येत आहे. प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक नरेश कडू  यांना याबाबत माहिती कळताच त्यांनी घटना स्थळी हजेरी लावली आणि ही बाब सिडको अधिकारी वडखळकर, अधीक्षक अभियंता गिरी , कार्यकारी अभियंता संजय पुदाले यांच्या निदर्शनास आणुन देत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली .

 

कोपरा ब्रिज जवळ अर्धवट कामकाज केलेला नाला बंद अवस्थेत आहे. तो जर या नाल्यास जोडला तर पाण्याचा विसर्ग होईल. आणि यामुळे कुठलीही दुर्घटना होणार नाही.  आणि ग्रामस्थांनाही याचा त्रास होणार नाही.

नरेश  ठाकूर -नगरसेवक, प्रभाग 6


खारघर से-11


खारघर से 36


टाटा हॉस्पिटल, खारघर

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News