जालन्यातील दोन मंडळात अतिवृष्टी

उमेश वाघमारे
Saturday, 27 July 2019

जालना: जालना जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 26) पावसाने सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी (ता. 27) सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 25.75 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यात वडीगोद्री व गोंदी मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. 

दरम्यान 1 जून पासून आज पर्यंत जिल्ह्यात केवळ 198.77 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 26) जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागात रिमझीम तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अंबड तालुक्यातील वडीगोद्री व गोंदी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. 

यात वडीगोद्री मंडळात तब्बल 84 मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर गोंदी मंडळात 68 मिली मीटर पावसाची नोंद झाली. तसेच घनसावंगी तालुक्यातील अंतरवली टेंम्बी मंडळात 61 मिली मीटर, तीर्थपुरी मंडळात 49 मिली मीटर, परतुर तालुक्यातील आष्टी मंडळात 48 मिली मीटर, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी मंडळात 42 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील इतर मंडळात ही पावसाने हजेरी लावली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News