जालना जिल्ह्यातील चार मंडळात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019
  • चोवीस तासात सरासरी 22.56 मिलिमीटर पावसाची नोंद
  • मंगळवारी जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस
  • जालना, राजुर, अनवा, भोकरदन, जाफराबाद या महसुली मंडळात 65 मिली मिटरपेक्षा जास्‍त पाऊस होऊन अतिवृष्टी

जालना: जिल्ह्यात बुधवारी (ता.29) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासात सरासरी 22.56 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता.2) दिवसभरात शहरास जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने चार मंडळात अतिवृष्टी झाली. 

दोन दिवसाची उघडीप दिल्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी सकाळी आठपर्यंत 22.56 मिली मिटर पावसाची नोंद झाली. यात जालना, राजुर, अनवा, भोकरदन, जाफराबाद या महसुली मंडळात 65 मिली मिटरपेक्षा जास्‍त पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. या पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक जून पासून ते बुधवारपर्यत जिल्ह्यात सरासरी 104.59  मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News