असा आलू पराठा बनवा आणि घरच्यांना खूष करा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

साहित्य : 2 वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, 3 मोठे उकडलेले बटाटे, 7-8 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या वाटून, 1 चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर चवीनूसार, पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप

कृती : कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी. त्यांनतर बटाटे किसून घेऊन किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा. भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. 

बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत. कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा. नंतर जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा. तयार आहे गरमागरम आलू पराठा.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News