श्रावण सरी

स्मिता मिलिंद
Friday, 2 August 2019

आला श्रावण श्रावण 
लता वेलींची गुंफण 
गच्चं मधाचे रांजण 
हिरवे गार त्याचे कोंदण।।

आला श्रावण श्रावण 
लता वेलींची गुंफण 
गच्चं मधाचे रांजण 
हिरवे गार त्याचे कोंदण।।

भरली ओढी तळी तुंब 
दाट नाभाचे त्यात बिंब 
जणू सावळा भोळा सांब 
दमरूचा रव त्याचा लांब लांब।।

रानोवनी कस्तुरी सुगंध गंध 
वासाने मन धुंद फुंद 
थेंबाचे झिरपणे मंद मंद 
हवाही झाली कुंद कुंद।।

पानोपानी हिरवा शिडकावा 
कुंजन करी गोड़ रावा 
दूरवरून गोपाळांचा पावा 
सृष्टी नटली
लेवुनी साज हा नवा।।

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News