आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कर्मयोगी - डॉ.अशोक बेलखोडे "

डॉ.राहुल तौर
Sunday, 17 November 2019

डॉ.अशोक बेलखोडे हे महाराष्ट्रातील आरोग्य ,समाजीक व शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठे नाव थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून मराठवाडा ,विदर्भ आणि तेलंगणाच्या सिमेवर असणाऱ्या अतिदुर्घम,डोंगरी ,आदीवासी व नक्षलप्रभावीत भागात त्यांचे कार्य हे अविरतपणे चालू आहे . 

एस. एम जोशी यांच्या जयंतीनिमित्त दि.१७ नोव्हेंबर रोजी  एस. एम जोशी सभागृह नवी पेठ येथे आयोजित कार्यक्रमात किनवट येथील साने गुरुजी रुग्णालयाच्या नवीन जागेतील अद्यवत व सुसज्ज वास्तुसाठी कै .एस. एम यांच्या स्नुषा डॉ.कांचन जोशी २५ लाख रुपयाची देणगी देणार आहेत त्यानिमित्ताने...."

डॉ.अशोक बेलखोडे हे महाराष्ट्रातील आरोग्य ,समाजीक व शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठे नाव थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून मराठवाडा ,विदर्भ आणि तेलंगणाच्या सिमेवर असणाऱ्या अतिदुर्घम,डोंगरी ,आदीवासी व नक्षलप्रभावीत भागात त्यांचे कार्य हे अविरतपणे चालू आहे .  डॉ.बेलखोडे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५९ रोजी  नागपूर जिल्ह्यातील कोतेवाडा या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबात झाला घरातील वारकरी संप्रदायाच्या संस्कारशील व आध्यात्मिक वातावरणाचा डॉ.बेलखोडे यांच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे.औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांचा हॅलो या वैद्यकीय विद्यार्थी चळवळीशी संबंध आला. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली वैद्यकीय शिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जाऊन गरीब व गरजू रुग्णांची सेवा करावी हा या मागील हेतू होता.

१९९०-९२ मध्ये त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड व गंगापूर येथे सरकारी दवाखान्यात नौकरी केली.दरम्यान डॉ.अरुण गद्रे यांचे किनवट चे दिवस हे पुस्तक वाचण्यात आले त्यातूनच त्यांनी किनवट सारख्या आदीवासी व अति दुर्घम भागात त्यांनी काम करण्याचे ठरवले व बाबांचा प्रेरणादायी आशीर्वाद  व भक्कम पाठिंबा घेऊन मोठ्या उत्साहात किनवटला१९९३ मध्ये सरकारी नौकरी स्वीकारुन कामास सुरवात केली  .आज ही किनवट तालुक्यात डॉ.बेलखोडे हे एकमेव सर्जन आहेत. त्यानंतरच्या काळात त्यांनी  भारत जोडो युवा अकादमी या नावाची संस्था स्थापन केली. भारत जोडो या नावातूनच  त्यांच्यावरील भारत जोडो यात्रेचा प्रभाव व्यक्त होतो.त्यानंतर १९९५ मध्ये डॉ.बेलखोडे यांनी किनवट येथे साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली सुरवातीला १५ खाटांनी सुरू केलेल्या रुगणालायची क्षमता पुढे २५ पर्यंत वाढत गेली पुढे चालून डॉ. बेलखोडे यांनी सरकारी नौकरी सोडून पूर्णवेळ रूग्णालयात गुंतवून घेतले.

तालुक्यातील रक्ताचा तूटवडा व गरज  पाहता  स्थानिक देणगीदारांच्या मदतीने २००८ मध्ये तालुक्यात प्रथमच रुदिरालय नावाने रक्त संकलन केन्द्र चालू केले.२०१० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया व फेरोदिया ट्रस्ट तर्फे वातानुकूलित व अत्याधुनिक दोन रुग्णवाहिका मिळाल्या त्यामुळे मराठवाडा विदर्भ आणि तेलंगणा या तीन विभागातील सुमारे ३९२ गावातील दिड लाखांहून अधिक रुग्ण व रुग्णालयांना याचा लाभ मिळाला.आज मोठ्या प्रमाणात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याबाबद डॉ.बेलखोडे यांचं कार्य उल्लेखनिय आहे त्यांनी आतापर्यंत सुमारे ८८ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यासाठी त्यांनी १लाख ९१हजार कि. मी चा प्रवास केला आहे . हा सुद्धा एक विक्रमच आहे .आज साने गुरुजी रुग्णालयातर्फे किनवट सारख्या मागास भागात सुसज्ज पॅथॉलॉजी,ऑपरेशन थेटर ,ई.सी.जी,एक्स- रे,फिजिओथेरपी ही अत्याधुनिक आरोग्याच्या सुविधा रुग्णांना पुरवण्यात येतात  व लवकरच डायलिसिस,इंडोस्कोपी या सुविधा सुरू करण्यात येणार आहे.किनवट हा तालूका नांदेड पासून १५० कि. मी दूर असल्याने या  ठिकाण कोणताच डॉक्टर येण्यासाठी तयार नसताना डॉ.बेलखोडे यांच्या प्रयत्नातून  रुग्णाच्या सोयीसाठी विविध शहरातून  प्रासंगिक डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करुन दिली. यामुळे अस्थिचिकित्सा, दंतचिकित्सा,नेत्रचिकित्सा, मानसोपचार सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देता आल्या आहेत.पूर्वी रुग्णांना या करीता १५० कि. मी लांब नांदेड किंवा यवतमाळ येथे जावे लागत असे.  हे रुग्णालय पूर्णपणे ' नो प्रॉफिट व नो लॉस 'या तत्वावर चालवण्यात येते .तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या विशेष सोयी साठी फिरता दवाखाना चालू केला आहे याचा लाभ गरीब आदिवासी रुग्णांना  होत आहे .यासाठी मुंबई च्या जी.आय.एस कंपनीने एक महिंद्रा बोलेरो गाडी उपलब्ध करून दिली आहे यामुळे गरिबांच्या दारात आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे.

आज भारत जोडो युवा अकादमी तर्फे व रुग्णालयातर्फे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आरोग्य मित्र व रुग्ण सहाय्यक या अभ्यासक्रमाचे संचालन करण्यात येते आता पर्यंत १०० च्या वर आदिवासी मुलींनी हे प्रशिक्षण पूर्ण करून आज त्या स्वतःच्या पायांवर उभ्या राहिल्या आहेत .आज जिल्यातील अनेक रुग्णालयात ते कार्यरत आहेत. तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना विज्ञाना विषयी आवड निर्माण करण्यासाठी किनवट सारख्या भागात मराठी विज्ञान परिषदेतर्फे तालुका विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र चालवले जाते.तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांची शालेय व उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून किनवट व बोधडी येथे शाळा व इस्लापुर येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरु केले आहे.तसेच या संस्थेस मानवलोक मिशन अंबेजोगाई तर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व जलसंधारनाच्या कामासाठी २ दोन जे.सी.बी मशीन देण्यात आल्या आहेत या मुळे या भागातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय डॉ.बेलखोडे यांनी केली आहे आता किनवट परिसरात सर्व सुविधा युक्त १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दोन टप्प्यात उभारण्याचा निर्धार डॉ. बेलखोडे यांनी केला आहे. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकर परदेशी यांनी एम. आय.डी. सी मध्ये पाच  एकर जागा उपलब्ध करून दिली आहे तसेच किनवट येथे काम करू इच्छेणाऱ्या विविध तज्ज्ञ व तरुण डॉक्टरांची जोड देण्याचा पर्यत डॉ.बेलखोडे यांनी चालू केला आहे.या रुग्णालयाचे काम वेगाने पुढे सरकण्यासाठी कै. एस. एम जोशी परिवाराची २५ लाख रुपयांची देणगी अत्यंत महत्वाची असणार आहे.या महत्वकांक्षि व किनवट परिसरासाठी मोठा आशेचा किरण बनू शकणारा प्रकल्प उचलून धरण्याची जवाबदारी आता समाजाची आहे म्हणून सर्वांनी यासाठी सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करून या कार्यासाठी आपले योगदान देणे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News