तो शपथविधी आता मार्गी लागणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • खाती वाढवण्याची शिवसेनेची अट
  • विखे पाटील यांच्या संपर्कात काही काँग्रेस आमदार असले, तरी भाजपमध्ये त्यांचे पुनर्वसन होईल काय​

मुंबई - गेले कित्येक महिने रेंगाळलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अखेर मुहूर्त मिळेल, अशी चिन्हे आहेत. मात्र केंद्रात अरविंद सावंत यांना अतिरिक्‍त मंत्रालयाची जबाबदारी मिळत नाही, तोवर विस्तारात सहभागी होणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. 

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट आमदारकीचाच राजीनामा दिल्याने मुलगा सुजयच्या पक्षप्रवेशावेळीच राधाकृष्ण यांना दिलेला मंत्रिपदाचा शब्द भाजप पाळणार, असे दिसते आहे. ‘पावसाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान प्रत्यक्षात येईल, अशी चिन्हे आहेत.

विखे पाटील यांच्या संपर्कात काही काँग्रेस आमदार असले, तरी भाजपमध्ये त्यांचे पुनर्वसन होईल काय, याबाबत प्रश्‍न असल्याने सध्या ते एकटेच पक्ष बदलतील, असे दिसते. विधिमंडळ प्रणालीतील एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे विदर्भातील एक आमदार त्यांच्या मित्रासह प्रवेशाची शक्‍यता वर्तवण्यात येत होती.

त्यांना भाजप उमेदवारीची हमी देईल काय, असे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याने सध्या शांतता बाळगली जाते आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याइतपत त्यांनी उत्तम कामगिरी नोंदवली, असे मानले जाते आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News