चक्क हे मुख्यमंत्री राहतात खेडयात... कोण आहेत हे, नक्कीच जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • शाळांच्या सुधारणांवर भर देणार!
  • याआधी मुख्यमंत्रिपदी असताना कुमारस्वामी यांनी ४७ वेळा ग्राम वास्तव्य उपक्रमाचे आयोजन केले होते​

बंगळूर : ताज्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये जबरदस्त मार खाणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) आता लोकांपर्यंत पोचण्यासाठी नवी रणनिती आखली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्याचा निर्धार करत ‘ग्राम वास्तव्य’ हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यात जाऊन राहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

कुमारस्वामी यांनी याआधीही मुख्यमंत्रिपदी (फेब्रुवारी २००६ ते आक्‍टोबर २००७) असताना खेड्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी या उपक्रमाचा आधार घेतला होता, लोकांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच सरकार कशा पद्धतीने काम करते आहे याचा फीडबॅक घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येईल. मुख्यमंत्री यंदा कोडगू जिल्ह्यातून हा उपक्रम सुरू करणार असून, मागील वर्षी या भागाला पुराचा मोठा तडाखा बसला होता.  

सरकारी शाळांमधूनच या उपक्रमाचा नारळ फुटणार असल्याचे कुमारस्वामी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून कुमारस्वामी ग्रामस्थांच्या घरी वास्तव्य करत असत. याखेपेस मात्र त्यांचे वास्तव्य सरकारी शाळांमध्ये असेल.

शाळांच्या सुधारणांवर भर देणार!
याआधी मुख्यमंत्रिपदी असताना कुमारस्वामी यांनी ४७ वेळा ग्राम वास्तव्य उपक्रमाचे आयोजन केले होते, तब्बल ४७ घरांमध्ये ते राहिले होते. याखेपेस त्यांनी सरकारी शाळांमध्ये राहण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच आज याची घोषणा करण्यात आली. शाळांमधील स्थिती सुधारावी, विद्यार्थ्यांनी सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी शाळेमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News