मराठी शाळेतली अशी धम्मल मस्ती अनुभवलीत का?

अनिकेत काळोखे
Thursday, 4 July 2019

आस करत करत जिच्या पाशी लवकर पोहचायच नसत, तिच्याच पुढे येऊन पोहचतो. ती म्हणजे आमची मराठी शाळा. तिथे पोहचल्यावर आमची कापड ही घरी वेगळी दिसत होती आणि येथे भलतीच..

ते शाळेतील दिवसच वेगळे होते. आता ती धावपळ नुसती डोळ्यांसमोर रेंगाळती. सकाळी मजेशीर उठायच,अंघोळ करायची. पावसाच्या सान्नीध्यात सुर्र$कन चहा ची चुरक मारायची.भरा भरा दप्तरामधे न बघता काहीही भरायच. छत्री घ्यायची व बैलावानी चालत निघायच. मग मधीच सोम्या-गोम्या साठी पावसात थांबण.मग सगळे जमा झाले की युद्ध युद्ध कसल तर एकमेकांना भिजवण्याच. ह्या युद्धात सगळी माकडच होती.

सगळ्यांच्या हालचाली ह्या माकड़ावानी...पाऊवाटेवर एकमेकांना भिजवता भिजवता खळग्यात जास्त पाणी दिसल की, मग झालेच सगळ्यांचे कल्याण. कुठल्या ही युद्धवीराला एवढा आनंद झाला नसेल; तेवढा आनंद आम्हाला एखादया जागी साठलेले भरमसाठ पाणी बघून व्हायचा. आस करत करत जिच्या पाशी लवकर पोहचायच नसत, तिच्याच पुढे येऊन पोहचतो. ती म्हणजे आमची मराठी शाळा. तिथे पोहचल्यावर आमची कापड ही घरी वेगळी दिसत होती आणि येथे भलतीच... जाऊदे असू दे शाळेत गेल्यावर युद्धाचा, हा$हा$हा त्या मजेशीर युद्धाचा पच्छाताप व्हायचा. कारण अंगाचा बर्फ झालेला असायचा. भांडी एकमेकांवर आदळावी तशी दातांची गत होऊन बसायची.

मग कस तरी अंगाला सुकवायच. व लगेच वही आणि पेन्सिल काढून शिक्षकाकडे लक्ष द्यायचे. नाहीतर वळवळ चालु झाली की, आहेच वरतुन छड़ी लागे छमछम-छमछम!! एवढ्या वेळानी भूख भरपूर लागायची. मग सगळ लक्ष कुठ?तर शाळेच्या घंटयावर! आणि घंटा झाली की लगेच डबा पोटात जाई. मग शाळेतील भाताच्या रांगेत उभ्या दिसतात त्या पांढऱ्या मुंग्या. ती धावपळ एखाद्या हरणाला ही लाजवेल. भोवताली सगळीकडे गारव्याची नशा आणि समोर गरम-गरम मस्त भात. वा! मिटक्या मारित, एकमेकांचे अनेक किस्से उघडकीस आणून तो भात खाणे...खाऊन झाल की त्या दूरवर दिसणाऱ्या पाण्याच्या टाकीवर झुंबड व्हायची.ते सगळ पाहिल की आठवण होते ती हत्तींची पाणी पिण्यासाठी झालेल्या जमावाची.सगळ आटपत नाय तर लगेच टन$टन$टन.मग पुन्हा सगळे वर्गात. ती आता गणित,व्याकरण... सगळी झोपेला पूरक ठरत होती.

कारण जेवण झाल होत. यानंतर वेध लागतात ते सकाळच्याच मजेशीर युद्धाचे! डोक्यात सकाळी कोणा-कोणाचा हिशोब चुकता करायचा राहिलाय याची गणित घोळू लागतात. हिशोब कसला? तर कोणाला भिजवायच याचा. त्याच्या डोक्यातील गणिताला प्रतिसाद म्हणून घंटयाचा आवाज होतो. सगळी एकत्र येऊ लागतात.एकत्र जमली की,निघालीच फौज आपल्या मार्गस्थी...मग प्रत्येक जन आपल्या डोक्यात शिजवलेली गणित यांची प्रायोगतिकता करतो. त्या वरुण राजाला हे सगळ पाहुन खुप आनंद होत असतो. तो दाद म्हणून रिमझिम चा आवाज आजुन जोरात वाढवतो. प्रत्येकाचे मनसूबे पूर्ण होतात. शेवटी प्रत्येकाला निरोप देताना प्रत्येकाच्या अंगावर येते. तशी गरम होण्याची ओढ़ ही लागलेली असतीच. सगळे पांगले की, मग प्रत्येकजण ही तयारी करीत असतो ती आईला द्यायला लागणाऱ्या कारणाची... का? कसा? भिजलो याची. पण घरी पोहचल्यावर सकाळी भिजल्या सारखा पच्छाताप नसतो... असतो तो फ़क्त मुक्त आनंद! आनंद! आनंद!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News