खरच शिवसेनेला शेतकऱ्यांचं काही पडलंय का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • गेले चार दिवस कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातला काही भाग पाण्यात वाहू जात आहे. मरणाच्या तोंडातून बाहेर येताना लोक दिसत आहेत. कोणाचं घरदार गेलय तर कोणाचा संसार उध्वस्त झालाय. फक्त काहींचं जीवन उध्वस्त होणे बाकी आहे, कदाचित त्यालाही कोणताच वेळ नसणार आहे.

गेले चार दिवस कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातला काही भाग पाण्यात वाहू जात आहे. मरणाच्या तोंडातून बाहेर येताना लोक दिसत आहेत. कोणाचं घरदार गेलय तर कोणाचा संसार उध्वस्त झालाय. फक्त काहींचं जीवन उध्वस्त होणे बाकी आहे, कदाचित त्यालाही कोणताच वेळ नसणार आहे. 

नाहक जीव जात आहेत इकडे आणि तिकडे. विरोधक प्रशासनावर बोट उचलत आहेत, प्रसारमाध्यमे व्यव्सथेवर बोट उचलत आहेत आणि ब्रेकिंगवर नुसत्या ब्रेकिंगचा खच पडत आहे. व्यवस्था, प्रशासन अशा अनेक गोष्टींच्या पलिकडे एक माणुसकी नावाचं अद्भूत जग आहे, जे आज मदतीसाठी खूणावतय त्याकडे कोणाचं काहीच लक्ष नसल्यासारखं झालय (NDRF आणि पोलिस यंत्रणा सोडल्यास). 

हे सगळं सोडाच, जे या परिस्थितीशी सामना करत आहेत त्यांना या कोणाच्या मदतीची गरज नाहीच आहे; पण लाचाराचं ढोंग घेतलेल्या आणि सत्तेच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांची नाटकं काही औरच चाललेत. त्यांच्या कानोशाला एकही खबर नाही की नेमकं राज्यात काय सुरू आहे. 

वाघ समजल्या जाणाऱ्या सेनेने काही दिवसांपूर्वी विमा वाल्यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांना घेऊन एल्गार उपसला होता, त्याचं काही पुढे झालंच नाही; मात्र आज जिथे नागरिकांना गरज आहे तर हे बंधू चक्क फोडाफोडीतच घुसले आहेत. दिनांक ८ रोजी उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या शेखर गोरेंची सेनेत एंट्री करून घेतली. तिकडे कोणाच्या घरात काय काय एंट्री करत आहे, याचा खूद्द त्यांनाच थांगपत्ता नाही आणि जनतेचे सेवक माननारे मात्र शिवबंधन गुंडाळून बसलेत. विनंती आपणास इतकीच तुमच्या मदतीची कोणतीच गरज आज कोणत्या विभागाला नाहीच, पण आज ज्या भागात पाणी साचलंय त्या भागात विधानसभेसाठी कोणती टोळी पाठवणार आहात, याचं नियोजन मात्र थोडं काटेकोरच करा. 

मुख्यमंत्र्यांसाठी थोडं काही...
पूर परिस्थिती बघताच भाजपाने महाजनादेश यात्रा रद्द केली, तिकडे राष्ट्रवादीवाल्यांनी शिवस्वराज्याची वाट बंद केली आणि आदित्याचा संवादही बंद झाल्याचं ऐकायला मिळतंय. ही सगळी मंडळी नेमकी कुठे गेली? पूर परिस्तिथीच्या तब्बल सातव्या दिवशी भाजपाच्या हेलिकॉप्टरने पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने उड्डान भरले, पण ते हवेतच होते आणि जिथे हवेतही जाण्याची परिस्थिती नव्हती, तिथे ते गेलेच नाहीत. 'महराष्ट्राच्या बाहेरून पश्चिम महाराष्ट्रासाठी बोटी येतील, त्यांचा सगळ्यात जास्त पुरवठा सांगलीमध्ये करण्यात येईल आणि जमलं तर (गरज पडली तर) एअर लिफ्टींगची सोय करणार, असा वरचष्मा मुख्यमंत्र्यांनी लगावला, पण प्रश्न असा उभे राहातो की सांगलीत एकाच जागेला १४ लोकांचा मृत्यू (त्यात बिचाऱ्या एक वर्षाच्या बाळाचादेखील समावेश), इतर ठिकाणांहून वाहून गेलेल्यांची संख्या वेगळीच आणि 3 हजाराहून अधिक जनावरे वाहून गेली असता अजून मुख्यमंत्र्यांचा जमलं तरची वेळ कधी येणार?

या अशा प्रसंगावेळी कवी अशोक कोळी यांनी लिहलेली एक कविता आवर्जून आठवते की म्हणजे...

नका नका मला देऊ नका खाऊ
वैरी पावसानं नेला माझा भाऊ
महापुरामध्ये घरदार गेलं
जुल्मी पावसानं दप्तरही नेलं
भांडीकुंडी माझी खेळणी वाहिली
लाडकी बाहुली जाताना पाहिली
हिंमत द्या थोडी उसळू द्या रक्त
पैसाबिसा नको दप्तर द्या फक्त…

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News