सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला मुख्यमंत्र्यांनी झिडकारले ; व्हिडिओ व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

कर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

कर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

कर्नाल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाल हे अनेकांच्या स्वागताचे स्वीकार करत होते. यावेळी अचानक एक युवक त्यांच्याजवळ आला व त्यांच्या पाया पडल्यानंतर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी खट्टर यांनी जोरात त्याचा हात झिडकारला. कर्नाल यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्या युवकाला बाजूला केले. खट्टर यांनी युवकाला झिडकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून, मख्यमंत्र्यांचा संयम ढळल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. 

दरम्यान, मनोहर लाल खट्टर हे छायाचित्र अथवा सेल्फी घेताना समर्थकांना नाराज करत नाहीत. परंतु, यावेळी त्यांनी युवकाला झिडकारले आहे. शिवाय, एक दांपत्य फेब्रुवारी महिन्यात खट्टर यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी खट्टर त्यांच्यावर चिडले होते. संबंधित व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. <

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News