हृतिक रोशनचा गुरुपौर्णिमेला पाटणा दौरा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

अभिनेता हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटाने समीक्षकांकडून वाहव्वा मिळवली. गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. हृतिक आता गुरुपौर्णिमेनिमित्त पटना दौरा करणार आहे

अभिनेता हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटाने समीक्षकांकडून वाहव्वा मिळवली. गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. हृतिक आता गुरुपौर्णिमेनिमित्त पटना दौरा करणार आहे.

पटना येथे आनंद कुमार यांचे घर आहे. हृतिक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंद कुमार यांची भेट घेणार आहे. यादरम्यान पटना येथील आनंद यांच्या शिक्षण संस्थेलाही तो भेट देणार आहे. आनंद कुमार यांचे कार्य आणि खरं आयुष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये खरं तर हृतिक यशस्वी ठरला आहे. ‘काबिल’ चित्रपटानंतर त्याचा हा चित्रपट आला आणि प्रेक्षक त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News