मेहनतीने गाठली यशाला गवसणी

सायली कदम (यिनबझ)
Monday, 24 June 2019

रमनदीप म्हणाली की,  आवड निर्माण केली की, अभ्यास करण्यात एक वेगळी मजाअसते. अशा पद्धतीने अभ्यास केला की यश मिळतेच..! 

मुंबई : राज्यातील दहावी बारावी निकालापाठोपाठ तृतीय वर्षांतील सर्वच क्षेत्राचे निकाल जाहीर होत आहेत. नुकताच बी.एम.एस. अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अनेकांनी यश मिळवले आहे. महात्मा गांधी मिशन, कामोठे या कॉलेजमधून बी.एम.एस. या अभ्यासक्रमात रमनदीप कौर उपाल हीने प्रथम क्रमांक पटकवला आहे. तीला १० पॉईंट्स पैकी ९.२०  पॉईंट्स मिळाले आहे. तिच्या या यशामुळे कॉलेजमधून सर्वच स्तरावर तिचे कौतुक होत आहे. 

रमनदीप कौर ही कळंबोली येथील रहिवासी आहे. तृतीय क्षेत्रात फायनान्स हा विषय स्पेशलायझेशन म्हणून निवडला होता. पुढे जाऊन ती फायनान्स क्षेत्रात एम.बी.ए. करणार असल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या यशाचे कारण सांगताना ती म्हणाली की, मी दिवसातले किमान दोन तास तरी अभ्यास करायची, आणि परीक्षेच्या वेळेस रात्रीचा अभ्यास करायची. रमनदीप म्हणाली की,  आवड निर्माण केली की, अभ्यास करण्यात एक वेगळी मजाअसते. अशा पद्धतीने अभ्यास केला की यश मिळतेच..! 
    
रमनदीप हीने तिच्या लहान भावासमोर आणि समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता अभ्यासात गोडी निर्माण करून तिने तिच्या यशाचा मार्ग सोपा केला आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News