हरवली पाखर

शुभांगी विलास पवार, सातारा
Thursday, 4 July 2019

"भिरभिरायची गोफण,
तिच्याच तालात,
हसायची स्वतःच,
स्वतःच्याच गालात.....!

"भिरभिरायची गोफण,
तिच्याच तालात,
हसायची स्वतःच,
स्वतःच्याच गालात..!

तिच्या राज्यात नव्हता,
त्या पाखराला वाव,
गोफणीच्या भिरभिरीत,
हरवला होता त्याचा भाव..!

भिरभिरीत त्या पाखराला,
अचूकपणे टिपायची,
त्यांच्यावर भिरकावून दगड,
पिकाला अलवार जपायची..!

अशी आवळायची ती,
पाखरांभोवती घट्ट फास,
हिरावून घ्यायची त्यांच्या मुखीचा,
तो भरजरी टपोरा घास..!

भिरभिरीत उडवायची ती,
पाखरांची पुरती दैना,
पाखरुच काय नाही फिरकायची,
ती काळी मैना..!

तिच्या भिरभिरण्यापुढे,
पाखरांनी टेकले हात,
विझली त्यांच्या जिवाची,
ती इवलीशी जीवनवात....!

एक-एक करता करता,
सारीच पाखरं तीने अचूक टिपली,
गोफणीच्या राज्यात ती,
त्यांच्या जीवालाच मुकली..!

हरवली पाखरं मग,
गोफणीच्या भिरभिरण्यात,
आता काय हशील राहिलाय,
तिच्या त्या किरकिरण्यात?...!

आता नाही उरला त्या,
गोफणीचाही तो गाव,
हरवली पाखरही आणि हरवलाय,
माणुसपणाचाही भाव.......!

                             

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News