वाढदिवसानिमित्त टायगरकडून दिशाला ‘खास’ शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

दिशाने एका चॉकलेटच्या जाहिरातीतून तिच्या अभिनय प्रवास सुरु केला. अत्यंत कमी वेळात दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं

अभिनेत्री दिशा पटानीचा आज, १३ जूनला वाढदिवस असून त्यानिमित्त तिचा जवळचा मित्र टायगर श्रॉफने तिच्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. टायगरने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये ते दोघंही नृत्याचा सराव करताना दिसत आहेत.

दिशाने एका चॉकलेटच्या जाहिरातीतून तिच्या अभिनय प्रवास सुरु केला. अत्यंत कमी वेळात दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. या चित्रपटानंतर दिशाच्या करिअरला कलाटणी मिळाली आणि आता ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सिनेसृष्टीत दिशा व अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोघे अनेकदा डिनर डेटवर जाताना किंवा एकत्र फिरताना दिसतात. दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना टायगरने ‘हॅपी बर्थ डे डी’ असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचं नृत्यकौशल्य दिसून येतंय. या दोघांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ बघणे आनंदाचे आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday D! @dishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

दिशा वाढदिवस साजरा करणार असली तरीही ती ‘मलंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिशा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नसून ती रात्री तिच्या जवळच्या माणसांसोबत जेवायला जाणार आहे. दिशा म्हणाली की, “मला आठवत नाहीये की शेवटची मी कधी बर्थ डे पार्टी केली असेल.” “टायगर श्रॉफ या डिनरला येणार आहे की नाही?” हे दिशाला विचारले असता ती म्हणाले की, “अजून माझे काहीच प्लॅन्स नाहीयेत.”

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News