"या" अभिनेत्रीने घेतला ४२व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. सुष्मिता-रोहमन सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो सतत शेअर करत असतात.

प्रियांका चोप्रा-निक जोनास यांनी त्यांच्यामधील वयाचं अंतर बाजूला ठेवून लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. सुष्मिता वयाच्या ४२व्या वर्षी तिचा प्रियकर रोहमन शॉलबरोबर लग्न करत आहे.

रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. सुष्मिता-रोहमन सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो सतत शेअर करत असतात. गेल्या एक ते दोन वर्षापासून हे दोघं एकमेकाला डेट करत आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये सुष्मिता-रोहमन लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

शिवाय रोहमन सुष्मिताच्या रेनी आणि अलिशा या दोन्ही मुलींबरोबरही वेळ घालवताना दिसतो. आता सुष्मिता तिच्या या लग्नाबाबत कधी खुलासा करते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News