मदतीचा हात

सुनील ढेपे
Monday, 12 August 2019

23 तारखेला येणाऱ्या वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा त्या पैश्यातून ज्यांच्या घरात पावसामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे त्यांना काहीतरी मदतीचा हातभार लावण्याचा निर्णय तिनं घेतला.

उस्मानाबादचे पत्रकार रवींद्र केसकर सर यांची मुलगी "सफल". यावर्षी ती इयत्ता चौथीत छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत आहे. महापुराच्या बातम्या पाहून ती खूप व्यथित झाली आहे. लहान मुलांच्या डोळ्यातील पाणी पाहून तिलाही रडू कोसळलं.

23 तारखेला येणाऱ्या वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा त्या पैश्यातून ज्यांच्या घरात पावसामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यांना काहीतरी मदतीचा हातभार लावण्याचा निर्णय तिनं घेतला. सफलच्या या हळवेपणानं आणि सामंजस्याने आम्हाला स्तिमित करून सोडलं आहे. तिच्या या निर्णयाला तिचे वडील रवींद्र व आई भाग्यश्री यांनी लगेच समर्थन दिले. तिच्या म्हणण्यानुसार लगेच डी मार्ट ही गाठले. आणि सफलला जे काही मदत म्हणून घ्यावं वाटलं ते सारं विकत घेतलं. 

सफलने स्वयंप्रेरणेने कोल्हापूर, सांगली आणि कोकण परिसरावर ओढवलेल्या आपत्तीमध्ये हातभार देण्यासाठी खालील साहित्याची स्वेच्छेने खरेदी केली. 

50 नवीन ब्लॅंकेट
50 नवीन टॉवेल्स 
50 नवीन कानटोप्या 
50 नवीन साड्या
50 राजीगिरे लाडूचे मोठे पॅक
50  एक किलोचे भंडंग पॅकेट
50 मोठे नमकीन बिस्कीट पॉकेट्स 
50 दूध पावडर पॉकेट्स
50 डेटॉल साबण पॅकस
50 नवीन शाल

याव्यतिरिक्त घरातील न वापरलेले चांगले कपडे, ओढण्या, साड्या, लहान मुलीचे कपडे, स्वेटर, सतरंजी, चादर, बेडसेट हे सारं आज व्यवस्थित पॅक केलं आहे. 

सफल म्हणते आपण जास्त काहीच केलेलं नाही. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या उक्तीप्रमाणेच माणसासारखं वागण्याचा प्रयत्न मी केला आहे. तिच्या या भावनेच मनातून कौतुक आणि आदर वाटतो आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News