हलकर्णी कॉलेजचा चंदगडी पाऊस 

कमलेश नारायण जाधव
Friday, 26 July 2019

पावसाची रिमझिम व्हावी आणि आपलं कॉलेज असावं, असं आजघडीला पुन्हा-पुन्हा वाटतयं. कितीदा जुन्या दिवसात हरवताना मला माझ्या हलकर्णी कॉलेजच्या परिसरात पावसात मनसोक्त भिजलेले दिवस आठवतात. थोडीशी जरी रिपरिप झाली, तरीही वाटेतून माझ्या कॉलेजकडे जाताना करावी लागलेली कसरत आजही तितक्याच ताकदीने आठवते. अशीच एक आठवण तुमच्या समोर घेऊन येत आहे.

पावसाची रिमझिम व्हावी आणि आपलं कॉलेज असावं, असं आजघडीला पुन्हा-पुन्हा वाटतयं. कितीदा जुन्या दिवसात हरवताना मला माझ्या हलकर्णी कॉलेजच्या परिसरात पावसात मनसोक्त भिजलेले दिवस आठवतात. थोडीशी जरी रिपरिप झाली, तरीही वाटेतून माझ्या कॉलेजकडे जाताना करावी लागलेली कसरत आजही तितक्याच ताकदीने आठवते. अशीच एक आठवण तुमच्या समोर घेऊन येत आहे.

माझे घर आणि कॉलेज यांच्यात फक्त एक किलोमीटरचे अंतर. मी जेव्हा कॉलेजला जायला सुरुवात केली, तेव्हा माझ्यासोबत माझा मित्र परशुराम गोवेकर, असच सकाळी-सकाळी कॉलेजला जात होतो. माझ्याकडे छत्री नव्हती, पाऊस जास्त पडत होता त्यातच दोघांकडे मिळून एक छत्री. मी एका बाजूने फारच भिजलो होतो. कॉलेजकडे जाणारा रस्ता फारच चिखलाचा झाला होता. कुणी गाडीवरून तर कुणी चालत कॉलेजला जात होते. आमच्यासमोर मुलींचा घोळका, आम्ही मध्ये  आणि पाठीमागे पुन्हा मुली. आम्ही कॉलेजच्या दिशेने चालत होतो. त्या मुली आमच्याकडे बघत होत्या. 

परशुराम मला बोलला, आपण पायऱ्या वरून जाऊ, प्रत्येक पायरी चढताना आम्हाला धाप लागत होती. एखाद्या किल्ल्यावर चढत होतो, असे वाटत होते. त्या पायर्‍या जरा निसरड्या झाल्या होत्या, बाजूला फारच गवत वाढले होते, उंच डेरेदार झाडांमध्ये अनेक आवाज येत होते, माझा पाय घसरला असताना मी गोवेकरच्या हाताचा हात धरला. आम्ही कसेबसे चालत जाऊन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पोहोचलो.. कॅम्पसमध्ये सकाळी-सकाळी भरपूर गर्दी झाली होती. जो-तो पावसात भिजत-भिजत येत होता. 

कॉलेज म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा काळ असतो. आमच्या कॉलेजचा सर्व परिसर पावसामुळे हिरवागार झाला होता. सगळीकडे गवत वाढले होते, कॉलेजची बेल झाली आणि आम्ही सर्व वर्गाकडे गेलो. वर्गांमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. पहिलेच लेक्चर आमच्यावर मायेने हात फिरवणारे आमचे गुरुवर्य डॉ. जरळी सरांचे, त्यात वर्गात पाणीच पाणी झाल्याने आम्हाला सरांनी दुसऱ्या  वर्गात दाखल केले व लेक्चरला सुरुवात केली. 

एकीकडे लेक्चर तर दुसरीकडे बाहेर पाऊस पडत होता. सकाळ सकाळी मध्येच मोरांचा ओरडण्याचा आवाज आमच्या कानावर पडत असे. आमच्या कॉलेजचा कॅम्पस म्हणजे जणू प्रति महाबळेश्वरचा परिसर झाला होता. ज्यांचे लेक्चर ऑफ होते, ते बाहेर पावसात ओला चिंब भिजत फोटो काढण्यात मग्न होते. इकडे आमचं लेक्चर संपले मी व गोवेकर कॉलेजच्या बाहेरील कॅन्टीनमध्ये जाऊन वडापाव आणि चहावर ताव मारत बसलो.

जसं आजचं लेक्चर संपलं तसच ते कॉलेजचे दिवसही हळूहळू संपले...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News