तुम्ही कलेजी अशीही बनवू शकता...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

कलेजी 

साहित्य 

  • पाव किलो कलेजी
  • २ मोठे कांदे चिरून
  • ४-५ लसुण पाकळ्या ठेचून
  • २ चमचे आल-लसुण पेस्ट
  • अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल)
  • पाव चमचा हिंग
  • १ चमचा हळद
  • २ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा गरम मसाला
  • २ मोठे चमचे तेल
  • थोडीशी कोथिंबीर चिरून
  • चवीनुसार मिठ

कृती

  1. प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा.
  2. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी.
  3. शिजल्यावर मिठ व गरम मसाला व कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी व परतवून गॅस बंद करावा. झाली कलेजी तय्यार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News