"यूथ इन्स्पिरेटर ऍवॉर्ड'मधून युवा कर्तृत्वाला सलाम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019

नाशिक: विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्यांना "यूथ इन्स्पिरेटर ऍवॉर्ड-2019'ने शनिवारी (ता.8) सन्मानित करण्यात आले. सुरेल गाणी, सुबक वादन, बहारदार नृत्य अशा कलांच्या सादरीकरणादरम्यान पुरस्कारांचे वितरण झाल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढली.
 

नाशिक: विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्यांना "यूथ इन्स्पिरेटर ऍवॉर्ड-2019'ने शनिवारी (ता.8) सन्मानित करण्यात आले. सुरेल गाणी, सुबक वादन, बहारदार नृत्य अशा कलांच्या सादरीकरणादरम्यान पुरस्कारांचे वितरण झाल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढली.
 
पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, इफकोच्या संचालिका साधना जाधव, नित्यानंद अनुभूती फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रमिला गिरी आदी उपस्थित होते. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, कम्युनिटी सर्व्हिसचे चीफ मॅनेजर तेजस गुजराथी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. 

या कार्यक्रमात अमित पांडे (उद्योग-स्टार्टअप्स), किरण कळसकर (विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी), मोहिनी भुसे व डॉ. रोहित भारती (कला आणि सांस्कृतिक), सोनाली अहिरे (शिक्षण), गौरव पानगव्हाणे (एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप), अभिषाल वाघ (कम्युनिटी सर्व्हिस, समाजसेवा) यांना पुरस्काराने सन्मानित केले. क्रीडा क्षेत्रातून सुपर ग्रॅंडमास्टर विदित गुजराथीचा पुरस्कार वडील डॉ. संतोष व आई डॉ. निकिता गुजराथी यांनी स्वीकारला.
 
पुरस्कार वितरण समारंभाची सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत वाढविली. एमएच 15 द बॅंडच्या कलावंतांनी सुंदर सादरीकरण केले. राहुल आंबेकर (गिटार), गणेश जाधव (कीबोर्ड), ड्रमवादनात विक्रम नोंदविणारा विनू नायर यांसह यश कदम यांनी कलावंतांना साथ दिली. रसिका नातू हिने अस्सल मराठमोळी गाणी सादर करत रसिकांचे लक्ष वेधले. मुळशी पॅटर्नमध्ये भूमिका साकारलेल्या दीप्ती धोत्रेने मराठी गीतांवर ठेका धरत मनोरंजन केले, तर मंगेश बोरगावकर व अबोली गिऱ्हे यांनीही आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर करत वाहवा मिळविली. अभिनेत्री व मॉडेल सानिका निर्मल हिने निवेदन केले. 

 

 'समीटद्वारे राज्याच्या नव्हे, देशाच्या तरुणाईला सकारात्मक संदेश मिळेल. गुणवत्तेसोबत स्वप्नपूर्तीसाठी कठोर मेहनतीची तयारी ठेवा'. 
- डॉ. आरती सिंह

'आपली आवड, बुद्धिमत्ता ओळखून करिअरच्या पर्यायांची निवड करणे योग्य राहते. आवडीतून आपापल्या क्षेत्रात काम करत युवकांनी केलेल्या कार्याचा पुरस्कारातून गौरव होतो'.
-साधना जाधव 

'समीट आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या युवकांचे कौतुक आहे. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा व्यक्‍तिगत आयुष्यात नक्‍कीच उपयोग होईल, असा विश्‍वास आहे.'
-प्रमिला गिरी 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News