हाफिज सईदला लवकरच अटक, पाकड्यांनी केला दावा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

पाकिस्तान सरकारने हिरवा कंदील दाखविल्याशिवाय हाफिजला अटक होणार नाही. मात्र, या आठवड्यात ही अटक होऊ शकते. हाफिज सईद सध्या लाहोरमधील त्याच्या निवासस्थानी आहे. 

लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्यासह जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या १३ जणांना लवकरच अटक करू, असे पाकिस्तानमधील पोलिसांनी आज सांगितले. या सर्वांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने हाफिज सईदसह १३ जणांविरोधात २३ एफआयआरची नोंद केली आहे. या सर्वांवर दहशतवादाला आर्थिक पाठबळ पुरविल्याचा आरोप आहे. या १३ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली असल्याने त्यांना लवकरच अटक करू, असे पंजाब प्रांताच्या पोलिसांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने हिरवा कंदील दाखविल्याशिवाय हाफिजला अटक होणार नाही. मात्र, या आठवड्यात ही अटक होऊ शकते. हाफिज सईद सध्या लाहोरमधील त्याच्या निवासस्थानी आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News