अभिनेता संग्राम समेळ बनणार हॅकर
अभिनेता संग्राम समेळ ‘ब्रेव्ह हार्ट’, ‘उडंगा’सारख्या चित्रपटात झळकला; तर ‘ललित २०५’, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत आणि ‘एकच प्याला’, ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता लवकरच तो एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

‘विक्की वेलिंगकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात संग्राम विक्कीचा मित्राची भूमिका साकारत असून तो एक हॅकर आहे. मैत्रीसाठी काहीही करणारा मित्र अशी त्याची भूमिका या चित्रपटात असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहे. संग्राम सोनालीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असून याबाबत संग्राम सांगतो, ‘मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या चित्रपटातून मी पहिल्यांदाच सोनालीसोबत काम करणार आहे. मला तिच्याबरोबर काम करताना फारच मजा आली.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ शर्मा यांनी केले आहे.