गस्ट क्रांती

सुरेश शेठ
Wednesday, 7 August 2019

आज जाहले गगन मोकळे
कोसळल्या सुख-पाऊस धारा
भासत होती आज दिवाळी
जागोजागी तोच नजारा

जम्मु-काश्मीरचे नंदनवन
आज अचानक कसे बहरले
सत्तर वर्षे श्वास कोंडुनी
होते सारे गुदमरलेले

आज जाहले गगन मोकळे
कोसळल्या सुख-पाऊस धारा
भासत होती आज दिवाळी
जागोजागी तोच नजारा

मोदी आणिक अमित शहांची
प्रचंड उर्जा इच्छाशक्ती
सकल जगाला दावीत होती
देशप्रेम अन् भारत-भक्ती

अत्याचारी आतंकवादी 
चालू होती ती मनमानी
हात तयांचे कलम जाहले
सरली सारी तानाशाही

तीनशे सत्तर कलमाखाली
फुटीरवादी क्रूर वागले
आज तयांचे सर्व मनसुबे
भारतभूच्या धुळीत मिळाले

अगम्य साहस ,धाडस दावुन
या जोडीने कमाल केली
हिंदुस्तानी इतिहासाची
सुवर्णपाने भरु लागली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News