गुरुपौर्णिमा

मंजूषा संतोष टंकसाली
Monday, 15 July 2019

प्रत्येकाला असावा एक तरी गुरु, 
गुरु असावा ज्ञानी, 
गुरु असावा स्वाभिमानी ,गुरु कधीच नसावा हट्टी अन् मानी, 

प्रत्येकाला असावा एक तरी गुरु, 
गुरु असावा ज्ञानी, 
गुरु असावा स्वाभिमानी ,गुरु कधीच नसावा हट्टी अन् मानी, 
गुरु असावा चंद्रासारखा शितळ, 
गुरु असावा पाण्यासम नितळ, 
गुरु कोण असावा याला नाही बंधन ,
विशाल सागर किंवा झिजणारे चंदन .
गुरुला नसते वयाचे बंधन. 
गुरु असू शकतो अवघे जीवन. 
झाड, वेली, किंवा ठेचकाळणारा दगडही, 
जो क्षणात शिकवून जाई बरच काही. गुरुजवळ नसतो कुठलाच धर्म, कुठलाच पंथ. 
म्हणूनच गुरु असतात ग्रंथ. 
जीवनाच्या अथांग सागरात तारतात गुरू. 
अस्थिर जीवनाला स़थैर्रय देतात गुरु. 
असा गुरु प्रत्येकाला एकदातरी भेटावा. 
जीवनाचा तो आनंदघन वाटावा. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News