गुजरातचं लिफ्ट एरिगेशन पॅटर्न आणि महाराष्ट्राचं लफडं

सुरज पाटील (यिनबझ)
Wednesday, 18 September 2019
  • फक्त ५०० फूट अंतरावर असलेल्या गुजरातमधल्या शेतकऱ्याला लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून तापी नदीचं पाणी कोणताही कर न देता फूकट वापरण्याची परवाणगी दिली आहे.

महाराष्ट्र दौरा खरा समजला तो म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात शेवटचं टोक असलेलं नंदूरबार जिल्ह्यातलं शहादा शहरात गेल्यानंतर. या शहराच्या शेजारी तापी नदी वाहते. त्या तापी नदीचं महान पात्र बघितलं की तिथे वावरणारे शेतकरी किती सुखी असू शकतील त्याचा वरवरचा अंदाज आपण काढू शकतो. मुळत: विषय असा आहे की गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सिमेवर वसलेला जिल्हा म्हणजेच नंदुरबार जिल्हा. हा जिल्हा पहिल्यापासूनच आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलाच आहे, मात्र तेथील सामाजिक भीषण परिस्थिती आणि महाराष्ट्र सरकारचं त्याकडे असलेलं दुर्लक्ष हेदेखील तेथील नागरिकांचं आदीवासी होण्याचं मुख्य कारण बनले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात शेतीचा मोठा खजिना आहे आणि त्याला पुरक असं वातावरणही आहेच पण सवाल असा आहे की टोपल्यात भाकरी असून उपवास असल्यासारखी तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. त्यासोबतच फक्त ५०० फूट अंतरावर असलेल्या गुजरातमधल्या शेतकऱ्याला लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून तापी नदीचं पाणी कोणताही कर न देता फूकट वापरण्याची परवाणगी दिली आहे. कोणीही शेतकरी येऊन तापी नदीला मोटार लावून आपल्या शेतीमध्ये हवं तेवढं पाणी घेऊ शकतो, तेही मोफत. हीच संकल्पना आपल्या राज्यात का नाही? 

नंदूरबार जिल्ह्यात फक्त पावसाळ्यातले चार महिने रोजगार असतो, तेथील नागरिकांचा पुढचा काळ महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये नाहीतर सगळ्यात उत्तम म्हणजे गुजरातमध्ये जातो. नंदुरबारच्या शहादा नावाच्या शहरामध्ये दर शुक्रवारी एक बाजारपेठ भरत असते, त्या बाजारपेठेत मेथी २० रूपये आर्धा किलो तर मिरची २० रूपये किलोच्या भावाने विकली जाते. तेथील शेतकऱ्यांकडे मोठा पिकसाठा आहेच; पण बाजारपेठ का नाही?

 आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने हजारो टीएमसी पाणी नुसता वाया घातले आहे. तापी नदीची सुरुवात मध्यप्रदेशमध्ये झाली, तेथून आलेले तापी नदीचे पाणी त्या-त्या हक्काच्या ठिकाणी आडवले गेले आहे, मात्र हेच पाणी कधीच महाराष्ट्राच्या सीमेत आडवले नाही. मध्यप्रदेशने त्यांच्या वाट्याला येणारे तापी नदीचे पाणी आडवलं, गुजरातने पाण्याचा असा बंदोबस्त केला आहे की त्याचं थोडं देखील पाणी महाराष्ट्रात येणार नाही, मात्र महाराष्ट्रातले तापी नदीच्या स्वरूपात हजारो टीएमसी पाणी गुजरातमध्ये जात, तेही बिना कोणत्या वापराचं, ना कोणत्या कराराविना. 

वरती नमुद केल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारसमोर दुष्काळ नाहीसा करण्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे, जो कित्येक समाजकार्यकर्त्यांनी सुचवला असेलच, पण आजही मांडतो तो म्हणजे सर्व नद्यांवर कालवे बांधावे आणि तेथील शेतकऱ्यांना लिफ्ट एरिगेशनचा फंडा सुरू करायचा. त्यामुळे शेतकऱ्याच्या मागे कोणतीच चवथाई सारखी पणवती लागणार नाही, की नाही कोणताच शेतकरी आत्महत्या करेल.

 आज महाराष्ट्र सरकारचं सगळ्यात मोठ अपयश हेच की राज्यात पडणारं पावसाचं पाणी कोणताही वापर न करता हिंद महासागरात मिसळलं जातं. जोपर्यंत शेतीपासून उद्योग धंद्यापर्यंत महाराष्ट्रातलं सगळं नैसर्गिक पाणी वापरलं जाणार नाही तोपर्यंत नंदूरबारसारख्या अनेक राज्यांना विकसनशील म्हणून घोषित करण्याचे कोणतेच अधिकार सरकारकडे नाहीत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News