कॉलेज ऑफ फार्मसीत युवा माहिती दूताचे मार्गदर्शन; रासेयो उद्घाटन

रुपेश बाजड
Saturday, 10 August 2019
  • कॉलेज ऑफ फार्मसी पुंडलिक नगर देगांव येथे रासेयो उद्घाटन
  • तसेच युवा माहितीदूत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

रिसोड - महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्ष  खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनखाली (ता. ९) कॉलेज ऑफ फार्मसी पुंडलिक नगर देगांव येथे रासेयो उद्घाटन तसेच युवा माहितीदूत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वन करुन झाली, कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर घोळवे (अनुलोम दुत रिसोड मालेगांव) तसेच अध्यक्ष डॉ. विजयकुमार काळे हे लाभले.

यावेळी ज्ञानेश्वर घोळवे यांनी शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील नागरिकापर्यत युवा माहिती दूत मोबाईल माध्यमातून पोहचवण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तसेच डॉ. विजयकुमार काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक तरनुम पठान, मनोगत विष्णू जगताप यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाला डॉ. सुनील क्षिरसागर, प्रा. युवराज पांढरे, प्रा. मनोज कदम, प्रा. बालाजी ठाकरे, प्रा. शिवाजी सावके, प्रा. संदीप वाठोरे, प्रा. गिरीश मुखमले, प्रा.शरद चौधरी, प्रा. महेश केकन, प्रा. पारस पोफाळकर, प्रा. आशिष टाले, प्रा. रामेश्वर राजगुरु, प्रा. तानाजी सुरुशे, प्रा. विशाखा बोरकर, तसेच राष्ट्रीय सेवा योजनाच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. राजनंदिनी सुरोशे, कार्यक्रम अधिकारी प्रा. चेतन कदम  तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक ठाकरे व आभार प्रदर्शन देविदास हुंबड या विद्यार्थ्यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विजयकुमार हुक्केरी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News