जीएसएस महाविद्यालयाचा उपक्रम : प्रत्येक वृक्षावर बसविला "क्‍यू आर कोड' 

मिलिंद देसाई
Saturday, 27 July 2019

सध्याच्या नव्या पिढीला विविध प्रकारच्या वृक्षांची नावे माहीत नसल्याची ओरड ऐकावयास मिळते. त्यामुळे विद्यार्थी त्या वृक्षांकडे केवळ एक वृक्ष म्हणूनच पाहतात. परंतु वेगवेगळ्या झाडांचे वेगळे महत्व असते. विद्यार्थ्यांना त्याबाबतची माहिती मिळावी यासाठी आरपीडी व जीएसएस महाविद्यालयाच्या आवारातील सर्व वृक्षांवर वनस्पतीशास्त्र विभागातर्फे "क्‍यू आर कोड' लावण्यात आला आहे. 

सध्याच्या नव्या पिढीला विविध प्रकारच्या वृक्षांची नावे माहीत नसल्याची ओरड ऐकावयास मिळते. त्यामुळे विद्यार्थी त्या वृक्षांकडे केवळ एक वृक्ष म्हणूनच पाहतात. परंतु वेगवेगळ्या झाडांचे वेगळे महत्व असते. विद्यार्थ्यांना त्याबाबतची माहिती मिळावी यासाठी आरपीडी व जीएसएस महाविद्यालयाच्या आवारातील सर्व वृक्षांवर वनस्पतीशास्त्र विभागातर्फे "क्‍यू आर कोड' लावण्यात आला आहे. 

या कोडवर स्कॅनिंग केले असता, एका क्षणात विद्यार्थ्यांना वृक्षाबाबत अधिक माहिती उपलब्ध होत आहे. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना झाडांप्रती अधिक माहिती मिळत आहे. 
स्वांतत्र्यपूर्व काळात सुरु झालेल्या एसकेई सोसायटी संचलीत आरपीडी व जीएसएस महाविद्यालयांच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. यामधील अनेक वृक्षांची नावे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना माहीत नसतात. त्यामुळे जीएसएस महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे परिसरातील सर्व वृक्षांवर "क्‍यू आर कोड' बसविण्यात आला आहे. 

आजकाल सर्व विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे विद्यार्थी सहजरित्या वृक्षावर लावण्यात आलेल्या "क्‍यू आर कोड'वर आपल्या मोबाईलमधून स्कॅनिंग करुन वृक्षाची माहिती करुन घेत आहेत. वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना वनस्पतींची योग्य प्रकारे माहिती मिळावी यासाठी वनस्पती उद्यान निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी गेल्यानंतर विविध प्रकारच्या वनस्पती व वृक्ष आपल्याला पहावयास मिळतात. 

प्रत्येक वृक्षाचे एक वेगळे महत्व असून प्रत्येक वृक्षाला एक वैज्ञानिक नाव असते. ती नावे विद्यार्थ्यांना माहित असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारातील सर्व वृक्षांना "क्‍यू आर कोड' देण्यात आला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना "क्‍यू आर कोड'बाबत कुतूहल वाटत होते. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी मोठ्या संख्येने "क्‍यू आर कोड'चा वापर करत वृक्षांची सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. 

जीएसएस महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती मिळावी यासाठी वृक्षांवर 'क्‍यू आर कोड' बसविण्यासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच महाविद्यालयांच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यातही आणखी रोप लागवड केली जाणार आहे. 
- सेवंतीलाल शाह, संचालक, एसकेई सोसायटी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News