शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांत वाढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • १०० टक्के निकालाच्या शाळांची संख्याही घटली
  • मुंबईतील ४१ शाळांचा निकाल शून्य ते दहा टक्के

मुंबई : दहावी निकालामध्ये यंदा राज्यभरातील १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी चार हजार २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. यामध्ये यंदा घट झाली असून १०० टक्के निकाल एक हजार ७१४ शाळांचा लागला आहे. तसेच राज्यात शून्य टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी ३३ वर मर्यादित असलेल्या शून्य टक्के शाळांचा आकडा यंदा थेट २०९ वर पोहचला आहे.

मुंबई विभागात १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या यंदा कमी झाली आहे. यंदा मुंबईत फक्त ३३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी १०० टक्के निकालाचे बिरुद मिरवणाऱ्या अनेक शाळांना यंदा निकालाची नव्वदी पार करताना देखील नाकीनऊ आले आहे. राज्यभरातून तब्बल एक हजार ७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण यंदाच्या तुलनेत ५० टक्‍क्‍यांनी जास्त होते. गेल्या वर्षी १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या चार हजार २८ इतकी होती. यंदा पुण्यात सर्वाधिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

मुंबईतील ४१ शाळांचा निकाल शून्य ते दहा टक्के
राज्यभरात यंदा शून्य ते दहा टक्के निकाल लागणाऱ्या शाळांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून गेल्या वर्षी हा आकडा ३३ इतकाच होता. नागपुरात यंदा ४५ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. मुंबईतील ४१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News