सलाम! चारही बाजूंनी पाण्यात अडकलेल्या गावाने केले प्रवाशांचे संगोपन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019

गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने जोर केला आहे. सगळीकडे नद्या नाले पातळी सोडून वाहात आहेत, त्यामुळे सगळीकडचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. NDRF चे जवान पुराच्या पाण्यात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावात बाहेरून आलेल्या प्रवाशांची राहण्यापासून त्यांच्या आंघोळीपर्यंत सोय करणे.

कोल्हापूर जिल्हातील हातकलंगले तालुक्यातील किणी गावाने अशावेळी प्रवाशांसाठी आधारवड बनण्याचं काम केलं आहे. एकिकडे वारणा नदी आणि दुसरीकडे पंचगंगा नदीने थैमान घालत असताना मध्येच असलेल्या किणी गावाने यावेळी सत्कर्माचे काम करत प्रवासादरम्यान अडकलेल्या 2 हजार प्रवाशांचे जेवन, अंघोळपासून राहाण्यापर्यंतची सर्व सुविधा केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News