दृष्टीदानाचा महायज्ञ

मंदार दोंदे
Wednesday, 27 February 2019

नवीन वर्ष काहीतरी नवीन घेऊन येईल या उर्मीने जानेवारी महिन्याच्या एक तारखेपासून उत्साहानी  कामाला लागलो,पण तेच तेच रुटीन,नेहेमीचेच शूट,स्क्रिप्ट,बाइट,मुलाखती आणि या वर्षात नवीन ते काय? असा सूर उमटू लागला.बुधवारी संध्याकाळी हेल्थ कॅम्प कव्हर करण्याचे शेड्युल होते.नेहेमीचेच असणार!असे समजून अगदी पाय ओढतच कॅमेरा पर्सन ला सोबत घेऊन  गेलो.

नवीन वर्ष काहीतरी नवीन घेऊन येईल या उर्मीने जानेवारी महिन्याच्या एक तारखेपासून उत्साहानी  कामाला लागलो,पण तेच तेच रुटीन,नेहेमीचेच शूट,स्क्रिप्ट,बाइट,मुलाखती आणि या वर्षात नवीन ते काय? असा सूर उमटू लागला.बुधवारी संध्याकाळी हेल्थ कॅम्प कव्हर करण्याचे शेड्युल होते.नेहेमीचेच असणार!असे समजून अगदी पाय ओढतच कॅमेरा पर्सन ला सोबत घेऊन  गेलो.

सुहास्य वादनाने अॅड के एस पाटीलांनी स्वागत केले.त्यांच्या सोबत सहा दिवस अगदी अंग मोडून काम केलेले पदाधिकाऱ्यांचे चेहेरे  स्वच्छपणे दिसत होते.थकल्यानंतर सुद्धा तितक्याच त्वेषाने सगळी मंडळी काम करत होती.गेल्या सहा दिवसात २५० पेक्षा जास्त रुग्णांवर मोतीबिंदू च्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडल्या होत्या.व्ही के हायस्कूल च्या प्रशस्त  वर्गात रुग्णांना राहण्याची सोय केली होती.अगदी साधी सोय असली तरी त्यात शिस्त होती,आपलेपण होते.स्वयंसेवक मनापासून  काम  करत होते.मोतीबिंदू च्या शस्त्रक्रियेनंतर खूप काळजी घ्यावी लागते,रुग्णाच्या घरी ती घेतली जाईलच याची काही शाश्वती नसते.म्हणून रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर निरीक्षणासाठी, त्यांच्या राहण्याची सोय केली होती.
     
खूप वर्षानंतर माझ्या शाळेत जात होतो.पाचवी "अ" च्या वर्गात उभा राहून जुन्या आठवणीत अगदी गुंग झालो असतानाच पाठीमागून के एस पाटील यांचा  आवाज आला,"सॉरी,जरा कामात होतो,आज सांगता आहे ना शिबिराची, सगळ्या रुग्णांचे फायनल चेक अप करून त्यांचे डिसचार्ज रिपोर्ट्स चे काम चालू होते,म्हणून उशीर झाला."
     
लायन्स क्लब राबवीत असलेल्या या अभियानात गरीब गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात,त्या सुद्धा विनामूल्य,त्यानंतर त्यांचा ६ दिवसांचा फॉलोअप.रुग्णांची राहण्यची,जेवण्याची,औषधाची सगळ्याची काळजी अगदी घरच्यासारखी घेतली जाते.एखाद्या मॉडेल हॉस्पिटल प्रमाणे सेवा केली जाते.पाटील भरभरून बोलत होते.१९९७ पासून ते "साईट फर्स्ट" या प्रोजेक्ट चे चेअरमन म्हणून काम करत आहेत.लायन्स क्लब ची पनवेल शाखा १९६५ साली स्थापन झाल्याचे त्यांनी सांगितले,डॉ.के ह गोखले क्लब चे संस्थापक अध्यक्ष.
   
खरं म्हणजे उतार वयात माणसाला चार गोष्टींची आवश्यकता असते,चांगले आरोग्य,चांगली मिळकत,आप्तेष्टांची साथ आणि चांगली दृष्टी.आणि हीच चांगली दृष्टी देण्याचे काम लायन्स क्लब करत आहे.पनवेल मध्ये विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे शिबीर आयोजित करण्याचे  हे ४६ वे वर्ष.बाईट घेताना कुणी २ मिनिटापेक्षा जास्त बोलायला लागलं कि आम्ही "बूम धारी" मंडळी त्यांना तिरके प्रश्न विचारून गप्प करण्याचा  प्रयत्न करतो.पण आज पाटीलांना थांबवावेसे वाटत नव्हते.बाईट चे रुपांतर मुलाखतीत कधी झाले ते मलासुद्धा कळले नाही.१९९७ साली पाटीलांनी चार्ज घेतल्यानंतर आय ओ एल (Intra ocular lenses) पद्धतीने शस्त्रक्रिया होऊ लागल्या,पाटील अभिमानाने प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगत होते.त्यापूर्वी टाक्याची शस्त्रक्रिया व्हायची.तेव्हा एअर कंडीशन आॅप्रेशन थिएटर उभारले जायचे,पण एकाच दिवसात सगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागत असल्याने सुरुवातीला मर्यादित  रुग्णांच्या शस्त्रक्रिया व्हायच्या. आज पर्यंत १३००० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.पाटील यांच्या कार्यकाळात ६५०० यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.डॉ नितीन शितुत,डॉ सुहास हळदीपूरकर तसेच कर्नाळा भूषण डॉ संतोष नायर यांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगत पाटीलांनी एम जी एम रुग्णालयाचे सुद्धा आभार  मानले. गेली दहा वर्षे साधू वासवानी मिशन आणि न्हावा शेवा  कंटेनर असोसिएशनची साथ मिळत असल्याचे ते म्हणाले.१९६५ सालापासून अगदी २०१४ पर्यंत हा प्रोजेक्ट आम्ही सरस्वती विद्या मंदिरात घेत असायचो.पण पनवेल च्या राजकारणात अत्यंत वाईट दिवस उजाडला.केवळ राजकीय सूडबुद्धीतून आम्हाला या स्तुत्य उपक्रमासाठी सरस्वती विद्या मंदिराची जागा चक्क नाकारली.मा आमदार विवेक पाटील आणि शेकाप चिटणीस बाळाराम पाटील यांच्या कडे आमची  कैफियत मांडली.दुसऱ्याच मिनिटाला आमच्या प्रोजेक्ट ला नवीन घर मिळाले...व्ही के हायस्कूल.या दोघांचे आभार मानावे तितके कमी आहेत.सरस्वती विद्या मंदिराजवळ एक माणसाला उभे ठेवले.सवयी प्रमाणे शेकडो लोकं तिथे येत  होती.राजकीय सूडबुद्धी बाळगणाऱ्यांची कीव येते हो! असे म्हणत उद्विग्न झालेल्या पाटीलांनी उसासा सोडला आणि प्रभू येशू च्या अविर्भावात म्हणाले "देवा यांना माफ कर...त्यांना माहित नाही ते काय करताहेत" असे म्हणून भर मुलाखतीत एक कडक टाळी मागितली.एकाच कॅम्प मध्ये ५७० यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा रेकोर्ड माझ्या नावावर आहे, असे म्हणत पाटील सात मजली हसले.नंतर म्हणाले गम्मत केली हो!हे सगळे आमच्या टीम चे श्रेय.पण आमचा हा रेकोर्ड आम्हीच मोडणार.
    
हा रेकोर्ड लवकरच मोडाल अशा सदिच्छा देऊन मुलाखत आटोपती घेतली.शूट पॅक-अप करून निघतच होतो.इतक्यात पाटीलांचा आवाज घुमला..अहो मंदारजी! हॅप्पी न्यू इयर बोलायचे  राहूनच गेले..मी हि म्हटले हॅप्पी न्यू इयर...वर्षाच्या सुरुवातीलाच एका अफाट-विराट समाजकार्याची  ओळख झाली होती.इयर नक्कीच "हॅप्पी" जाणार....

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News