महाकाय, तरी चपळ मल्ल; दादू चौगुले
- देशांतर्गत स्पर्धा आणि आखाडे गाजवत दादूमामा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटविला. राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी मिळविलेले रौप्यपदक त्याचीच साक्ष देते.
लाल मातीतील कुस्तीत घडलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेले दादूमामा यांनी वयाच्या सातव्या वर्षी अर्जुनवाडा गावाच्या तालमीतून कुस्तीचे धडे गिरवायला सुरवात केली. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी मोतीबाग तालमीत प्रवेश केला आणि तेथून त्यांच्या कारकिर्दीला पैलू पडू लागले. महाकाय शरीरयष्टी असूनही त्यांची आखाड्यातील चपळता प्रतिस्पर्ध्याला बुचकळ्यात टाकणारी होती. देशांतर्गत स्पर्धा आणि आखाडे गाजवत दादूमामा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटविला. राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी मिळविलेले रौप्यपदक त्याचीच साक्ष देते.
सादिक पंजाबी, महाबली सत्पाल यांच्यासारख्या नामवंत मल्लांबरोबरही त्यांनी लढलेल्या कुस्त्या विसरता येणार नाहीत. कुस्तीगीर म्हणून विश्रांती घेतल्यानंतरही दादूमामा स्वस्थ बसले नाहीत. ज्या कुस्तीने भरभरून दिले, त्याचे उतराई होण्यासाठी त्यांनी मल्ल घडविण्यास मोतीबाग तालमीतूनच सुरवात केली. पारंपरिक डाव शिकविताना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला अधुनिकतेची जोड देत अनेक महाराष्ट्र केसरी मल्ल घडवले. यात मुलगा विनोद चौगले, समाधान घोडके यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. विनोदने तर ‘महाराष्ट्र केसरी’बरोबरच ‘हिंद केसरी’चाही बहुमान मिळविला.
दोन वेळा महाराष्ट्र केसरी
- १९७० पुणे, १९७१ अलिबाग, रुस्तुम-ए-हिंद
- ३ मार्च १९७३, मुंबई महान, भारत केसरी
- ३ एप्रिल १९७३, नवी दिल्ली, राष्ट्रकुल रौप्यपदक
- (१९७४, न्यूझीलंड), राष्ट्रीय सुवर्णपदक
- (२८ डिसेंबर १९७६, बेळगाव)