"द ग्रेट शाहू..."

सुरज पी. दहागावकर
Wednesday, 7 August 2019

जयसिंगराव यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान होते. ते इंग्रजीमध्ये बोलू शकतात असा अभिप्राय संस्थानचे कारभारी रावबहादूर महादेव वासुदेव बर्वे यांनी नमूद केलं आहे, त्याचप्रमाणे मुलांचे विवाह अठरा वर्षे झाल्यावरच करावीत, अशी इच्छासुद्धा त्यांनी मृत्युपत्रात व्यक्त केली होती.
(संदर्भ:- राजर्षी शाहू गौरव ग्रंथ)

पूर्वज -  घाटगे घराणे मूळचे राजपूत आणि राजपुताण्यातील राठोड या कुळातले होते. हेच राठोड सूर्यवंशी होते. यावनी आक्रमणामुळे जी राजपूत घराणे दक्षिणेकडे स्थलांतरित झाली, त्यात घाटगे घराण्याचासुद्धा समावेश होता. या कुळातील कामराज सूर्यवंशी यांनी चौदाव्या शतकात आपल्या पराक्रमाने, कर्तुत्वाने बिदरच्या सुल्तानाकडून सरदारपद मिळविले, पण कामराज घाटगे या नावानेच. या सूर्यवंशीपासून घाटगे नाव कसे झाले ह्याचा इतिहाससुद्धा खूप सुंदर आहे. 

या कामराज सूर्यवंशी सरदाराने एकदा खूप उंचीवर टांगलेली घंटा वरच्यावर उड्या मारून दोनदा वाजविली त्यामुळे घाट वाजविणारे घाटगे असे नामांतर झाले. दुसरी एक गोष्ट म्हणजे एकदा ह्या घराण्यांचे पूर्वज लखमोजी आणि रामोजी हे रसद घेऊन बिदरला जात असताना त्यांना एका घाटात शत्रूंनी अडविले, पण आपल्या पराक्रमाने त्यांनी शत्रूचा पराभव करून तो घाट आपल्या ताब्यात घेतला म्हणूनच घाट घेणारे घाटगे असे नाव पडले. घाटगे हे कागलचे जहागिरदार होते.

१८१५ मध्ये कागलचे अधिपती हिंदुरावबाबा शिंदे दरबारी गेले होते आणि नंतर परत आलेच नाही. त्यामुळे १८१५ ते १८७८ ह्या 63 वर्षाच्या काळात कागल जहागीर कारभारावर नोकरशाहीचा वरचष्मा राहिला होता. या काळात प्रजा त्रासून गेली, सर्वत्र अशांतता पसरलेली होती, खजिना रिक्त झाला होता आणि एवढेच नाही तर जहागिरला न झेपावणारे कर्ज झाले होते. अशावेळी करवीर दरबाराने कागल जहागीर आपल्या ताब्यात घेतली. अशा बिकट परिस्थितीत जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे (शाहू महाराज यांचे वडील) यांच्या रूपाने आशेचा किरण दिसला. जयसिंगराव यांचा जन्म करवीरचे छत्रपती बाबासाहेबमहाराज यांच्या भगिनी बाळाबाई आणि नारायणराव घाटगे यांच्या पोटी ०१ मार्च १८५६ रोजी झाला..घाटगे घरच्यांना इतिहास अभिमानास्पद असून तो सुवर्णअक्षरांनी लिहला गेला आहे.

कुशाग्र बुद्धीच्या आपल्या भाच्यांचे शिक्षण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून बाबासाहेबमहाराजांनी एल्फिन्स्टन कॉलेजचे फेलो यशवंत आठले यांना जयसिंगरावाचे ट्यूटर म्हणून नेमणूक केली. १८७७ मध्ये कृष्णजी गोखले यांची शिक्षक म्हणून नेमणूक केली. गोखले यांनी जयसिंगराव यांना वाचनाचा छंद लावला.

जयसिंगराव लहानपणापासूनच धिप्पाड शरीराने कुस्ती आणि धाडसाने शिकार करण्यात तरबेज झाले. कागल जहागिरीत चोऱ्यामाऱ्याचे आणि दरोडेखोरीचे प्रमाण खुप वाढेल होते. रयतेचा कुणी त्राता उरलेला नव्हता. जहागीर कर्जात बुडाली होती. अशा बिकट, भयानक परिस्थितीमध्ये जयसिंगराव यांच्याकडे १८७८ मध्ये कारभाराची सूत्रे हाती आली. 

कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या राज्यातील लोकांची स्थिती, आर्थिक स्थिती आणि राज्यकारभाराची रीती नीट करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यकारभारात समाजपयोगी कामे करण्यास सुरुवात केली. जयसिंगरावांने आपल्या कारकिर्दीत मोठ्या तडफतेने, कुशाग्र बुद्धीने आणि काटकसरीने कारभार केला त्यामुळे वरीष्ठांच्या वर्तुळात त्यांचा समर्थ प्रशासक म्हणून नावलौकिक झाला होता; पण २० मार्च १८८६ रोजी जयसिंगराव यांच्यावर काळाने घात केला. त्यांचे अवघ्या तीस वर्षात निधन झाले. 

मुत्युच्या वेळी असि. पो. वुईल्यम ली वॉर्नर हे जयसिंगराव यांच्याजवळ होते.त्यांच्याजवळचे जयसिंगराव यांनी अखेरची इच्छा व्यक्त केली. हेच जयसिंगरावचे अलिखित मृत्युपत्र होय. या तोंडी मृत्युपत्रात जयसिंगराव म्हणतात की, "जोपर्यत आपल्या मुलांना इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान आणि सराव होत नाही तोपर्यत त्यांना इंग्लंडला पाठवू नये. जयसिंगराव यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान होते. ते इंग्रजीमध्ये बोलू शकतात असा अभिप्राय संस्थानचे कारभारी रावबहादूर महादेव वासुदेव बर्वे यांनी नमूद केलं आहे, त्याचप्रमाणे मुलांचे विवाह अठरा वर्षे झाल्यावरच करावीत, अशी इच्छासुद्धा त्यांनी मृत्युपत्रात व्यक्त केली होती.
(संदर्भ:- राजर्षी शाहू गौरव ग्रंथ)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News