पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृषी विद्यापीठात भव्य कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात सकाळी ७ ते ८ यावेळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 
  • अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर योग समिती गठित करण्यात आली आहे. 

अकोलाः आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात सकाळी ७ ते ८ यावेळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर योग समिती गठित करण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून २१ जून हा दिवस साजरा करतात येतो. प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविदयालय येथे प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला योग दिवस साजरा करावयाचा आहे.

दरवर्षी १२ ते २५ जानेवारी या कालावधित योग सप्ताह साजरा करण्यात येत असतो. जिल्हास्तरावर योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रत्येक शासकीय , निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शाळा, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी, पंतजली योग समिती, पोलिस प्रशिक्षण केंद्र, एनसीसी व एनएसएस, स्काऊट गाईड, योग भारती, क्रीडा भारती, किसान भारती, इंडियन मेडिकल असोशिएशन, योग परिषद, अंजिक्य फिटनेस पार्क, योगासन व सांस्कृतिक मंडळ, योग विद्याधाम, योगासन सेवा समिती, आरोग्य भारती, ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय, स्वयंसिध्दा प्रशिक्षण केंद्र, संत निरंकारी मंडळ, प्रताप्रती गृप, गायत्री गृप, आर्य समाज मंडळ इत्यादी सहभागी होणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News