चित्रपट क्षेत्रातील करिअर एक उत्तम संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी विद्यार्थ्यांना आज उपलब्ध होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना या चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते, परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बहुतांश जण खूप धडपडत आपले मार्गक्रमण करत असतात.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी विद्यार्थ्यांना आज उपलब्ध होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना या चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते, परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बहुतांश जण खूप धडपडत आपले मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे सुरुवातीला या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींची आपण माहिती करून घेऊ या - मंदार करंजाळकर

स्वत:चा कल ओळखणे

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला स्वत:चा कल ओळखणे अतिशय गरजेचे आहे. आपल्याला या क्षेत्रात खरेच करिअर का करण्याची इच्छा आहे याचे थोडे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करण्याची गरज आहे. नुसती आवड किंवा इच्छा असणे वेगळे आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असणे वेगळे. आपल्या क्षमता आणि बलस्थानांचा विचार करून मग निर्णय घेणे कधीही चांगले जसे की काही जणांनी शाळा-कॉलेज पातळीवर वेगवेगळ्या नाटय़ स्पर्धामध्ये भाग घेतलेला असतो आणि त्यांना आता या क्षेत्रात पूर्णवेळ अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून आपले नशीब अजमवायचे असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News