विद्यापीठाच्या प्रवेशात यंदा मोठी घट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019
  • क्षमता ९५३ अन्‌ प्रवेश मात्र ६२१; विद्यार्थ्यांच्या मागे तगादा

सोलापूर - पुणे, मुंबई, कोल्हापूर विद्यापीठांच्या तुलनेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी यंदा पाठ फिरवली आहे. एकाच जिल्ह्यासाठी ओळख असलेल्या विद्यापीठाची पदवी घेऊन नोकरीसाठी बाहेर पडल्यानंतर म्हणावी तशी नोकरी मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने ठोस पावले न उचलल्याने यंदा विद्यापीठातील आठ संकुलांची प्रवेशक्षमता ९५३ असतानाही ६२१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. उर्वरित जागा भरण्याकरिता विद्यापीठाने आता काउंसिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागे प्रवेशासाठी तगादा लावल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी, या उद्देशाने २००५ मध्ये सोलापूर विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. मात्र, पैसे घेऊन नापास विद्यार्थ्यांना पास करणे, प्रात्यक्षिकांपेक्षा पारंपरिक शिक्षणालाच प्राध्यापकांची पसंती, विद्यार्थ्यांची गैरहजेरी, परीक्षांचा निकाल वेळेवर नाही, यासह अन्य कारणांमुळे विद्यापीठ मागील काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना नोकरीनिमित्त मुलाखती वेळी येतोय. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुणे अथवा कोल्हापूर विद्यापीठात प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रवेश क्षमतेनुसार प्रवेश होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार अनेक अभ्यासक्रम सुरू केले, मात्र अन्य विद्यापीठांच्या तुलनेत नोकरीत म्हणावी तशी संधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.

 ‘री-एन्ट्रन्स’ची नामुष्की
पर्यावरणशास्त्र, एमबीए, एमकॉम, स्कूल ऑफ सायन्स, फिजिक्‍स या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. विद्यार्थ्यांना काउंसिलिंग करूनही विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने आता या अभ्यासक्रमांसाठी पुन्हा एन्ट्रन्स परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. पुणे, मुंबईसह अन्य विद्यापीठांच्या तुलनेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठाला ताण काढावा लागतोय. मागच्या वर्षी विद्यापीठातील आठ संकुलांसाठी ८१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. द्वितीय वर्षासाठीही विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने विद्यापीठाची 
विभागनिहाय प्रवेशक्षमता अन्‌ प्रवेश

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News