पदवी- पदव्युत्तर विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत;विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा विद्यार्थ्याना फटका

सुहास सदाव्रते 
Tuesday, 2 July 2019

 

  • जालना जिल्हयात जवळपास वीस हजार विद्यार्थी मूळ गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत आहेत

जालना : विद्यापीठीय पदवी व पदव्युत्तर वर्गाचे निकाल लागले खरे परंतु विद्यार्थ्यांना अद्यापही मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. जालना जिल्हयात जवळपास वीस हजार विद्यार्थी मूळ गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत आहेत, हे विशेष. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गाचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यार्थ्यानी ऑनलाईन निकाल पाहिले आणि त्याची प्रतही घेतली आहे. परंतु अद्यापही विद्यार्थ्याना मूळ गुणपत्रिकाच मिळालेल्या नाहीत, अशी विश्‍वसनीय सुत्रानी माहिती दिली आहे.

विद्यापीठाने दिवाळी दरम्यान घेतलेल्या सेमीस्टर परीक्षेचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना मिळाले नसल्याचे महाविद्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या पहिल्या वर्षाचे निकाल लागले आहेत. पण विद्यार्थ्याना जर इतर विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर मूळ गुणपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. या मुळे विद्यार्थ्याना इतर विद्यापीठात प्रवेश घेता येत नाही, अशी परिस्थिती असल्याचे प्राचार्याचे म्हणणे आहे.

जालना जिल्हयातील विविध महाविद्यालयातील अनेक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे जवळपास वीस हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्याना अद्यापही मूळ गुणपत्रिकाच मिळालेल्या नसल्याचे शहरातील एका महाविद्यालयातील प्राचार्यानी सांगितले आहे. विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून अशाप्रकारे पहिल्यांदाच गुणपत्रिकेचा मोठा विषय गंभीर बनला आहे. पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी महाविद्यालयात मूळ गुणपत्रिकेची मागणी करीत असून प्राचार्याना मात्र चांगलीच समस्या निर्माण झाली आहे. विद्यापीठाकडूनच गुणपत्रिकाच आलेल्या नाहीत असे सांगितले तरी विद्याथी विश्‍वास ठेवायला तयार नसल्याचे चित्र शहरातील वरिष्ठ महाविद्यालयात पाहायाला मिळत आहे. 

पदवी पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्याना अद्यापही मूळ गुणपत्रिकाच मिळालेल्या नाहीत. विद्यापीठाचा ढिसाळ कारभार कसा असतो याचा प्रत्यय अनुभवाने महाविद्यालयांना चांगलेच धारेवर धरण्याचे प्रकार होत आहे. 
- डॉ.लक्ष्मीकांत शिंदे, सिनेट सदस्य, जालना 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News