'आपल्या सरकाराच्या कामगिरी गळतगार'; एसटीतही छ्त्री वापरण्याचे सरकारचे आदेश?

पंकज भारसाकळे 
Sunday, 28 July 2019

तेल्हारा - तेल्हारा आगरच्या बसेस गेल्या कित्येक दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच गेल्या कित्येक दिवसाच्या उघडीपानंतर तेल्हारा शहर व तालुक्यात पाण्याची सतत संतधार पाऊस रात्रभर सुरू आहे.

तेल्हारा - तेल्हारा आगरच्या बसेस गेल्या कित्येक दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच गेल्या कित्येक दिवसाच्या उघडीपानंतर तेल्हारा शहर व तालुक्यात पाण्याची सतत संतधार पाऊस रात्रभर सुरू आहे.

दैनंदिन कामासासाठी तालुक्यातील हजारो प्रवाशी हे जिल्हा ठिकाणी असलेल्या अकोला येथे दर दिवसाला प्रवास करीत असतात. त्यातच सध्या तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. नेहमीच तेल्हारा ते अकोला शेगाव खामगाव अकोट गाड्या ह्या कुठेतरी मध्येच बंद पडत आसल्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे अत्यंत महत्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या सर्व सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. काहींचे तर दवाखान्यात व परीक्षा केंद्रात वेळात न पोहोचल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.

अशातच आज तेल्हारा अकोला बस रत्यावर धावत असताना बसच्या आत बसलेले प्रवाशी मात्र चक्क छत्री घेवून बसताना आढळुन आले. चक्क बसचे छतच गळताना पाहत अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत बसमध्ये बसलेले प्रवाशांनी अधिकारी यांच्यांशी संपर्क साधला असता, बस आगारमध्ये आल्यावर आम्ही तपासणी करतो व दुरुस्त करीता वर्कशॉपला पाठवितो असे कळविण्यात आले.

एकीकडे शासन म्हणते व जाहिरात बाजी करून सांगते की अवैध वाहनाने प्रवास करू नका. एसटी, बसने प्रवास करा व आपले जीवाचे रक्षण करा, मात्र त्याच एसटीमध्ये जर त्यांना छत्री घेऊन बसण्याची वेळ येत असेल, तर काय कामाचे? त्यातच सध्या वाढत्या महागाईमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, तर पैसे पूर्ण घेऊन बसमध्ये सुविधा काही नसतानाचे चित्र आहे.

'आपले सरकार कामगिरी दमदार' असे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या शासनाने तथा एस टी बससोबत एसीकोच शिवशाही वाहन देऊन महाराष्ट्रला नवीन ओळख करून देणारे व्यक्तीमत्व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र्रातील अशा अनेक आगराच्या बसेसची भीषण परिस्थिती लक्षात घेता यावर तातडीने उपाय योजना कराव्या अशी मागणी जनतेतून होत आहे. त्यातच जिल्हातील व अकोट मतदार संघातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींनी हा विषय शासन दरबारी लावून धरल्यास तो लवकरच निकाली निघेल व तेल्हारा आगराच्या भंगार बसचे परिवर्तन होईल, अशी आपेक्षा स्थानिक प्रवाशांनी वयक्त केली आहे.

अत्यंत खराब रस्त्यांमुळे गाड्या भंगार  झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही गाड्या वर्कशॉपमधून  दुरुस्ती होऊन रस्त्यावर धावत असल्यातरी, खराब रस्त्यांमुळे पुन्हा त्या खराब होत आहे, त्या परत वर्कशॉपला पाठविण्यात येत आहेत.  नवीन गाड्यांची मागणी केली जात आहे, नवीन गाड्या मिळाल्यानंतर प्रवाशी यांची गैरसोय होणार नाही. 
- संतोष वानरे, आगरप्रमुख, तेल्हारा आगर 

मी आज तेल्हारा-अकोला प्रवास दरम्यान बसमध्ये होतो. सदर बसचे छत सतत गळत असल्याने प्रवास अत्यंत त्रासदायक झाला. अशा नादुरुस्त गाड्या डेपोने दुरुस्ती करून पाठवल्या पाहिजे जेणेकरून प्रवाशांचे होणार नाहीत 
 -अक्षय बुरघाटे, प्रवासी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News