Union Budget 2019 - उच्च शिक्षणासाठी सरकार 400 कोटी खर्च करणार: अर्थमंत्री निर्मला सीतारमण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात 400 कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या, पण शिक्षण क्षेत्रासंबंधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार शिक्षण क्षेत्रासाठी नवं धोरण आणण्याची घोषणा केली आहे.

भारत सरकार येत्या काळात उच्च शिक्षणासाठी 400 कोटी खर्च करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच शिक्षण क्षेत्रासाठी नवीन राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय ऑनलाइन अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश आहे.

देशातील तीन मोठ्या शैक्षणिक संस्थांची गणना जगातील 200 प्रमुख संस्थांमध्ये होत आहे. जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News