सरकार आपणांस एक विनंती...

सुरज मुकुंदराव कांबळे
Friday, 2 August 2019

सातवा वेतन लागू करून
भरला तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचा घसा,
काबाडकष्ट करून इथल्या पोशिंद्याचा,
ठेवला पुन्हा एकदा रिकामा खिसा...

डल्ल पगार वाढ करून,
साजरी करतात ते दिवाळी न होळी,
मरमर करून इथल्या राजाची,
ठेवता तुम्ही फाटलीच झोळी...

निवडणूक होती तेव्हा केले,
पंधरा पंधरा लाख येण्याचे वादे,
थापा मारून भुलविणारे,
कुठे गेले हो तुमचे प्यादे...

सातवा वेतन लागू करून
भरला तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचा घसा,
काबाडकष्ट करून इथल्या पोशिंद्याचा,
ठेवला पुन्हा एकदा रिकामा खिसा...

डल्ल पगार वाढ करून,
साजरी करतात ते दिवाळी न होळी,
मरमर करून इथल्या राजाची,
ठेवता तुम्ही फाटलीच झोळी...

निवडणूक होती तेव्हा केले,
पंधरा पंधरा लाख येण्याचे वादे,
थापा मारून भुलविणारे,
कुठे गेले हो तुमचे प्यादे...

जनधन खाते काढून,
रिकामा तरास दिला तुम्ही बँकेला,
पण या वेळेस तरी ही जनता,
माफ तरी का हो तूमच्या या चुकीला...

सतराशे छप्पन योजना काढून,
केला तुम्ही आमचा घोळ
छप्पन इंच आमच्या छातीचा,
झाला हो आता बट्ट्याबोळ...

म्हणे चाय विकून
बनला मोदी पंतप्रधान,
पण इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर,
चर्चा करण्यास नाही आलं का हो भान...

काळापैसा घरी यावा म्हणून,
न सांगता केली तुम्ही नोटबंदी,
पण तुमच्या हिटलर गिरीन,
भारताच्या खात्यावरच आली आर्थिक मंदी...

उज्वला योजना काढून,
तुम्ही वाटले फुकट गॅस कनेक्षण,
पण त्याचा गॅस त तुम्ही माहगावला,
हे कुठलं तुमचं निती न धोरणं...

अच्छे दिन आने वाले है,
असं म्हणून लुटली तुम्ही वाहवाही,
कुठे गेले हो अच्छे दिन,
की म्हणावं,
हीच होती तुम्ही खोटी लोकशाही...

युवकांना रोजगार भेटणं,
म्हणून केली त्यांनी तुम्हाला वोट,
असा भ्रमनिरास करून,
दिली न आमच्या मनाला चोट...

पाच वर्षे भरपूर केले तुम्ही,
विदेशी दौरे,
आता निवडणूक आली त,
लागले प्रचार कराले सारेच्या सारे...

शहरी भागाच्या तुम्ही,
उद्यानापासून तर रोडपर्यंत,
केल्या गरजा पूर्ण,
आमच्या ग्रामीण भागात,
कधी देणार विकासाचं चूर्ण...

विरोधी पक्ष्यांनी केली ,
तुमच्या पदाची टिंगल,
म्हणून तुम्हा चोर,
एकदा तरी द्या न हो,
यांना या प्रश्नाचं प्रत्युत्तर...

जी एस टी च्या कचाट्यात,
तुम्ही जनतेला अटकवलं,
ते लागू करून,
फार काही साध्य नाही केलं

मोदी सर आता एकच विनंती आहे,
नको आम्हाला खात्यात पंधरा लाख,
खोटे वायदे करून आम्हाला,
नका टाकू आमच्या गळ्यात फास,
आमचा माल निघाला,
त्यालाच द्या न किंमत खास,
बेरोजगारी वाढली आहे,
त्यावर तुम्ही तोडगा काढावा,
ही एकच आहे आस,
कचऱ्या पेक्षा इथली माणसे,
महत्वाची आहेत,
त्यांचाच विकास करण्याचं मनी ठेवा ध्यास...

कर्जमाफी काही त्यावर नाही इलाज,
शेतीची ध्येय धोरण चांगली राबवा,
एवढी तरी या निवडणुकीत ठेवा,
पोशिंदा,कास्तकार,शेतकरी,
भूमीपुत्राची लाज,
नाही तर गळफास घेऊन पिढी,
नष्ट होणार उद्या किंवा आज...
अश्याने नष्ट होऊन जाईल,
कृषिप्रधान देश म्हणण्याचा ताज...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News