अनाथांच्या प्रश्‍नांबाबत शासन सकारात्मक : पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • वसाहतीगृहांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न

अनाथ बालकांसाठीच्या अनुदानात वाढ करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. अनाथांना असलेल्या एक टक्के आरक्षणानुसार वसाहतीगृहांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न असून, कौशल्य विकास अभियानाच्या अंतर्गत त्यांना स्वयंसिद्ध करण्याचा प्रयत्नही शासन करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिली.

अपंग बालकांसाठी ज्याप्रमाणे बॅंक खात्यात अनुदान जमा केले जाते, तशीच सुविधा अनाथ बालकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे मुंडे म्हणाल्या.विधानसभेत आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील अनाथ बालकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना मुंडे बोलत होत्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News