JNU विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकल; फी वाढीचा निर्णय घेतला मागे

स्वप्नील भालेराव (सकाळ यिनबझ)
Wednesday, 13 November 2019
  • वस्तीगृह फी वाढ आणि अन्य फी कमी करण्याचा निर्णय विद्यापीठ कार्यकारी समितीने घेतला​
  • गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची योजना
  • काय आहे फी वाढ प्रकरण

दिल्ली: जेएनयुच्या विद्यार्थ्यांनी फी वाढ विरोधात केलेल्या आंदोलनासमोर सरकारला झुकते माप घ्यावे लागले. विद्यापीठ प्रशासानाने फी वाढीचा निर्णय मागे घेतला आहे. "वस्तीगृह फी वाढ आणि अन्या फी कमी करण्याचा निर्णय विद्यापीठ कार्यकारी समितीने घेतला आहे" अशी माहिती शिक्षण सचिव आय. सुब्रमण्यन यांनी दिली.

गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची योजना
"मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या योजनेचा प्रस्ताव विद्यापीठ कार्यकारी समितीने विद्यार्थ्यांसमोर मांडला. अशी माहिती शिक्षण सचिव आय. सुब्रमण्यन यांनी एक टि्वट करुन दिली.
 

काय आहे फी वाढ प्रकरण
जेएनयु प्रशासनाने 'हॉस्टेल मैनुअल ड्राफ्ट' तयार केला होता. त्यात वस्तीगृह भाडे वाढ, ड्रेस कोड आणि कर्फ्यू विद्यार्थ्यांना लागू करण्याचा प्रस्ताव होता. रात्री 10.00 नंतर विजिटर्सना भेटण्याची बंदी होती. तसेच मुलांना मुलिंच्या रुम मध्ये प्रवेश निषेद करण्यात आला होता. हे नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरण्याचा प्रस्ताव होता. 'हॉस्टेल मैनुअल ड्राफ्ट' विरोधात जेएनयुच्या विद्यार्थांचे अनेक दिवसापासून आंदोलन सुरु होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News