छत्रपतींच्या किल्ल्यांवर आता होणार हॉटेल्स,लग्न !

सकाळ (यिनबझ)
Friday, 6 September 2019

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले 25 किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्नसमारंभासाठी दिर्घ मुदतीच्या करारानं खासगी कंपन्याना विकण्याचा संतापजनक निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध सुरु झाला आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले 25 किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्नसमारंभासाठी दिर्घ मुदतीच्या करारानं खासगी कंपन्याना विकण्याचा संतापजनक निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध सुरु झाला आहे.

Image result for maharashtra forts

महाराष्ट्र पर्यटन विकास विभागानं तयार केलेल्या या प्रस्तावाला राज्यमंत्रीमंडळाने 3 सप्टेंबर ला मंजूरी दिली. यामधे राज्यातील 353 गड किल्ल्यांपैका 100 संरक्षित किल्ल्यांची निवड करून त्यातील 25 किल्ले खासगी उद्योगांना देण्यात येणार आहेत. या उद्योगांना 60 ते 90 वर्षाच्या करारावर हे किल्ले दिले जाणार असून त्यातून राज्याचे उत्पादन वाढणार असल्याचे सांगितले जाते. 

या गड किल्ल्यांवर ‘हेरिटेज हाॅटेल्स’ उभारली जाणार आहेत. त्याशिवाय लग्नसमारंभ व इतर करमणुकीच्या कार्यक्रमासाठी या किल्ल्याचा वापर करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. 

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातील शिवभक्त संस्था, संघठनांसोबत विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी हा निर्णय संतापजनक असल्याची प्रतिक्रीया देत सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा सवाल त्यांनी केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News