मोदींपेक्षा हेच सरकार चांगले : अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • फडणवीस सरकारचे कौतुक
  • ‘‘राज्याचा माहिती अधिकार कायदा देशाला मार्गदर्शक ​

पुणे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात प्रभावी लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्याबाबत ‘लोकायुक्त अधिनियम १९७१ दुरुस्तीसाठी संयुक्त मसुदा समिती’ आणि सरकारच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक यशदा येथे सुरू आहे. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. 

अण्णा हजारे म्हणाले, ‘‘राज्याचा माहिती अधिकार कायदा देशाला मार्गदर्शक ठरला. त्यानुसार लोकायुक्‍त कायदाही मार्गदर्शक आणि प्रभावी व्हावा, यासाठी मसुदा तयार करण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबतचे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. हे विधेयक संमत होऊन त्याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे.’’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News