सरस प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे आक्रमण सुखावणारे; गोपीचंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • चिराग-सात्विकचा उंचावत असलेला आत्मविश्‍वास तसेच त्यांनी त्यांच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांचा न डगमगता केलेला सामना, त्यांच्याविरुद्धचे आक्रमण जास्त सुखावणारे आहे, असे मत भारताचे राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
  • पुल्लेला गोपीचंद

मुंबई - चिराग-सात्विकचा उंचावत असलेला आत्मविश्‍वास तसेच त्यांनी त्यांच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांचा न डगमगता केलेला सामना, त्यांच्याविरुद्धचे आक्रमण जास्त सुखावणारे आहे, असे मत भारताचे राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

सात्विक-चिरागचा खेळ चांगला होत आहे. त्यांचा खेळ एकमेकांना पूरक होत आहे. काहीशी संधी असताना दुसरा गेम त्यांच्या हातून निसटला, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी आपला तोच जोष कायम ठेवला. त्यांनी महत्त्वाच्या लढतीत आपला खेळ उंचावला. प्रत्येक रॅलीस प्रत्युत्तर दिले, हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे, असे गोपीचंद यांनी "सकाळ'ला सांगितले.

चिराग आणि सात्विकची कामगिरी सतत चांगली होत आहे. त्यांना या प्रकारच्या यशाची आवश्‍यकता होती. ते त्यांनी मिळवले आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीत आजी-माजी जागतिक विजेत्यांना त्यांनी पराजित केले, हे नक्कीच सोपे नसते. ते कधीही डगमगले नाहीत. त्यांचा आपण काय करू शकतो यावर विश्‍वास होता. त्यांच्या कठोर परिश्रमास लाभलेले हे फळ आहे आणि ही केवळ सुरुवात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News