गुगलच्या बांधावर बसून

प्रवीण पवार
Monday, 1 April 2019

गुगलच्या बांधावर कधी 
आभाळ दाटून येतं का..? 
पघळल्या ढेकरातला मातीचा
सुगंध तुम्हाला घेता येतो का..? 

गुगलच्या 
बांधावर बसून 
तुम्हाला खरंच कळतंय का
आमच्या शेती मातीतलं दुःख.? 
विविध वेबसाईटवर जाऊन 
कृत्रीम अनुभवात तुम्ही 
जास्त रमणार नाही 
पण
एक सांगतो - 
तुम्हाला 
भाकर डाऊनलोड 
करता जमणार नाही ..! 

गाव, शाळा 
डिजिटल झाली 
मग डिजिटल 
रक्तदान होईल का..? 
तुमच्या डिजिटल वार्यानं 
भूईत डिजिटल पाऊस होईल का.? 
तुमच्या डिजिटल जुपनीला जुपून 
डिजिटल नांगरनी ,पेरणी, वखरणी 
होणार नाही 
पण 
एक सांगतो..- 
तुम्हाला 
डिजिटल ग्रामीण जीवन 
जगता येणार नाही..! 

अरे तुमच्या 
गुगलच्या बांधावर कधी 
आभाळ दाटून येतं का..? 
पघळल्या ढेकरातला मातीचा
सुगंध तुम्हाला घेता येतो का..? 
आधार लिंक केलंय 
कुणाला माझं मन 
लिंक करता जमणार नाही 
जन्मतःच नवीन विचारधारना घेऊन 
आलोय या जगात 
पण 
एक सांगतो - 
तुम्हाला ,
माझ्यातला 'मी' पुन्हा 
कधी जन्मणार नाही..!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News