७० हजार तरुणांना दाखवला मार्ग : विश्वास नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

''पोलिस सेवेत असतांना केवळ कायदा- सुव्यवस्था नव्हे तर समाजातील विविध कारणांनी भरकटलेल्या युवकांना दिशा देण्याचा, त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न मी आजवर केला आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते भरकटु शकतात. म्हणूनच विविध कारणांनी भरकटल्याने गुन्हेगारीकडे वळलेल्या सत्तर हजार युवकांचे समुपदेशन करुन त्यांना यशाचा व चांगला मार्ग दाखविण्याचे काम केले आहे," असे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे सांगितले.

नाशिक : ''पोलिस सेवेत असतांना केवळ कायदा- सुव्यवस्था नव्हे तर समाजातील विविध कारणांनी भरकटलेल्या युवकांना दिशा देण्याचा, त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न मी आजवर केला आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते भरकटु शकतात. म्हणूनच विविध कारणांनी भरकटल्याने गुन्हेगारीकडे वळलेल्या सत्तर हजार युवकांचे समुपदेशन करुन त्यांना यशाचा व चांगला मार्ग दाखविण्याचे काम केले आहे," असे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे सांगितले.

'सकाळ'तर्फे झालेल्या डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे झालेल्या 'यिन समर यूथ समीट 2019' कार्यक्रमात त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पोलिस दलातील आपले अनुभव सांगीतले. ते म्हणाले, ''विचार हेच आपले शब्द ठरवितात. आपण उच्चारत असलेल्या शब्दांतून कृती ठरते. कृतीतून सवय जडत असते. चांगली सवय ही चांगले चारित्र्य घडवत असते.''जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग निवडायला नको. त्यापेक्षा कठोर मेहनतीतून मिळविलेले यश दीर्घकाळ टिकते, असे मत नांगरे-पाटील यांनी व्यक्‍त केले.

ते पुढे म्हणाले की, देहामध्ये शक्‍ती, मनात उत्साह, बुद्धीत विवेक, मनगटात बळ व शुद्ध चारित्र्य असलेला खऱ्या अर्थाने युवक असतो. आपले वय, वजन किंवा वेशभूषा नव्हे, तर आपण काय बोलतो, काय वाचतो यावर आपल्या व्यक्‍तिमत्त्वाची छाप पडते. युवकांची डोकी सुपीक असतात. आवश्‍यकता असते त्यांची योग्य पद्धतीने मशागत करण्याची. सोशल मीडिया, मोबाईलला अडथळा ठरू न देता करिअरसाठीची ब्लू-प्रिंट तयार करा. उद्दिष्ट निश्‍चित केल्यानंतर त्या दिशेने मार्गक्रमण करा, असे नमूद करताना त्यांनी पोलिस खात्यात काम करतानाचे अनुभव विशद केले. भरकटल्याने गुन्हेगारीकडे वळालेल्या तरुणांना योग्य दिशा दाखविताना 70 हजार युवकांचे समुपदेशन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष सरकारी वकील अॅड उज्ज्वल निकम, युवक नेते रोहित पवार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News